शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलिया व भारत ‘अ’ संघांदरम्यान लढत

By admin | Updated: July 21, 2015 23:45 IST

बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारत ‘अ’ संघ बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या दोन सामन्यांच्या

चेन्नई : बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारत ‘अ’ संघ बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सराव सामना आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध खेळणार आहे.नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारत ‘अ’ संघ बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या मालिकेच्या निमित्ताने भारतासाठी क्रिकेटपटूंची मोठी फळी निर्माण करण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या सध्याच्या तांत्रिक समितीने भारत ‘अ’ संघाच्या दौऱ्यांवर विशेष भर दिला आहे. कारण त्यामुळे सिनिअर संघासाठी भविष्यातील क्रिकेटपटू शोधण्यास मदत मिळणार आहे. भारत ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर द्रविडने स्पष्ट केले होते, की गोलंदाजांमध्ये २० बळी घेण्याची आणि फलंदाजांमध्ये खेळपट्टीवर तळ ठोकण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा करणार आहे. कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेल्या पुजाराला लवकरच सूर गवसेल अशी आशा आहे. इंग्लंड व आॅस्ट्रेलियामध्ये निराशाजनक कामगिरीनंतर पुजाराला बांगलादेशविरुद्ध अलीकडेच खेळल्या गेलेल्या मालिकेत संधी मिळाली नव्हती. पुजाराने यापूर्वी दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिजविरुद्ध ‘अ’ संघाचे नेतृत्व केलेले आहे. पुजाराला आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध आपली नेतृत्वक्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. भारतीय संघात युवा व अनुभवी खेळाडूंचा समावेश असून, मायदेशात चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहेत.पुजाराव्यतिरिक्त के. एल. राहुल, अभिनव मुकुंद, फिरकीपटू अमित मिश्रा आणि प्रग्यान ओझा यांनाही आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे. वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोन व उमेश यादव सिनिअर संघातील आपले स्थान पक्के करण्यास उत्सुक आहेत. संघाची तुलना करताना भारताचा संघ समतोल आहे. आघाडीची फळी मजबूत असून अ‍ॅरोन, यादव आणि अभिमन्यू मिथुन यांच्या समावेशामुळे वेगवान गोलंदाजीमध्ये विविधता आहे. फिरकीची जबाबदारी सांभाळण्यास अमित मिश्रा सज्ज असून, त्याची साथ देण्यासाठी ओझा आहे. (वृत्तसंस्था)