शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

डे-नाईट कसोटीला प्रेक्षकांची पसंती

By admin | Updated: November 30, 2015 00:53 IST

मला डे-नाईट कसोटीची संकल्पना आवडली. गुलाबी चेंडूचा वापर करण्याचा विचारही योग्य आहे. ही कल्पना साकारणाऱ्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मी प्रशंसा करण्यास उत्सुक आहे.

मला डे-नाईट कसोटीची संकल्पना आवडली. गुलाबी चेंडूचा वापर करण्याचा विचारही योग्य आहे. ही कल्पना साकारणाऱ्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मी प्रशंसा करण्यास उत्सुक आहे. गुलाबी चेंडू आपला आकार कायम राखू शकतो का? गुलाबी चेंडू उपखंडात किती यशस्वी ठरतो हे बघावे लागेल. डे-नाईट कसोटीचे टीकाकारही असतील; पण कॅरी पॅकर्सचा विचार ज्यावेळी आला त्यावेळीही त्यावर टीका करणारे बरेच लोक होते. पण, त्यानंतर वन-डे सोबत काय घडले, हे तुम्ही अनुभवले आहेच. डे-नाईट कसोटीची संकल्पनाही त्याच्या दिशेने वाटचाल करू शकते. आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि काहीअंशी न्यूझीलंडचा अपवाद वगळला तर बरेच कमी चाहते कसोटी क्रिकेट बघण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असतात. डे-नाईट कसोटीमध्ये चाहत्यांना पुन्हा या खेळाकडे आकर्षित करण्याची क्षमता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हळूहळू बदल करायला पाहिजे, असा माझा सल्ला आहे. गुलाबी चेंडूचा वापर नवी संकल्पना आहे. हा चेंडू योग्य पद्धतीने कार्य करतो किंवा नाही, हे बघावे लागेल. त्यानंतरच कसोटी क्रिकेटमध्ये याचा वापर करता येईल. गुलाबी चेंडू दोन्ही बाजूला स्विंग होतो. या चेंडूला उसळीही चांगली मिळते आणि सीमही आहे. कसोटी रंगीत कपड्यामध्ये खेळण्याची चर्चा करणे सध्या घाईचे ठरेल; पण सध्या गुलाबी चेंडू कसोटी क्रिकेटमध्ये मोठे पाऊल ठरले आहे. कल्पना करा की, ईडन गार्डन्समध्ये भारत-पाकिस्तान संघांदरम्यान डे-नाईट कसोटी सामना खेळला जात आहे. या लढतीसाठी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले राहील, यासाठी मी शर्यत लावायला तयार आहे. डे-नाईट कसोटी सामन्यात खेळ दुपारी तीन वाजता प्रारंभ होईल आणि जवळजवळ १० वाजता संपेल.डे-नाईट कसोटी व्यतिरिक्त मी माझे व रवी शास्त्रीचे वक्तव्य वाचले. तो नेहमी विश्वासाने बोलतो. नागपूरमध्ये जर प्लेसिस व आमला विश्वासाने खेळू शकतात, तर उर्वरित फलंदाज का खेळू शकत नाहीत, हे शास्त्रीचे वक्तव्य योग्यच आहे. मला आठवते ज्यावेळी सुनील गावसकर १९८७ मध्ये पाकिस्ताविरुद्ध बंगलोरमध्ये अखेरचा कसोटी सामना खेळत होते. त्यावेळी त्यांनी ९६ धावांची संस्मरणीय खेळी केली होती. त्यावेळची खेळपट्टी नागपूरच्या खेळपट्टीच्या तुलनेत अधिक खराब होती. त्या खेळपट्टीवर चेंडू अधिक वळत होता. टर्निंग विकेटवर खेळताना त्यासाठी तयारी करावी लागते.दिल्ली खेळपट्टीवरही लवकरच तसेच चेंडू वळतील, अशी आशा आहे. खेळपट्टी कुस्तीचा आखाडा होत नाही तोपर्यंत कुणाला त्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. (टीसीएम)