शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

बीसीसीआयला आरटीआयमध्ये आणण्याचे प्रयत्न

By admin | Updated: August 14, 2014 04:48 IST

बीसीसीआयसह सर्वच राष्ट्रीय क्रीडा महासंघांना माहितीच्या अधिकारकक्षेत आणणाऱ्या राष्ट्रीय क्रीडाविकास विधेयकाचा मसुदा तयार झाला आहे

नवी दिल्ली : बीसीसीआयसह सर्वच राष्ट्रीय क्रीडा महासंघांना माहितीच्या अधिकारकक्षेत आणणाऱ्या राष्ट्रीय क्रीडाविकास विधेयकाचा मसुदा तयार झाला आहे. खेळाडूंशी संबंधित खासगी, तसेच गोपनीय माहितीसंबंधित कलमदेखील मसुद्यातून वगळण्यात आले आहे. क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत ही माहिती देताना सांगितले, की काही मुद्यांवर सविस्तर चर्चेची गरज असल्यामुळे राष्ट्रीय क्रीडाविकास विधेयक कधी कायद्याचे स्वरूप घेईल, हे सांगणे कठीण आहे. विविध स्तरांतून येणाऱ्या तक्रारी, शासकीय निधीचा दुरुपयोग, डोपिंगला आळा घालणे, महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण, खरे वय लपविण्याचे प्रकार आदींबाबत राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या कामकाजात पारदर्शीपणा आणणे, त्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि शिस्तबद्धपणा आणण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. काही महासंघांमध्ये वय आणि कार्यकाळाचे बंधन, तसेच निवडणुकांमध्ये अफरातफरी असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाईदेखील करण्यात आल्याची माहिती सोनोवाल यांनी लेखी उत्तरात दिली. अफरातफरीच्या कारवाईमुळेच तिरंदाजी महासंघ व अ‍ॅमेच्युअर बॉक्सिंग महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली. कॉर्फबॉल महासंघाची मान्यता २०१२ पासून रद्द करण्यात आली, तर भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाला त्यांच्या काही पदकाधिकाऱ्यांच्या निवडणुका नव्याने घेण्याचे निर्देश देण्यात आले. या दोन्ही महासंघांनी निवडणुकांसंबंधी दिशानिर्देशांचे पालन केले नव्हते. भारतीय जिम्नॅस्टिक महासंघालादेखील नव्याने निवडणुका घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यांनी होकारही दिला. खेळातील मॅचफिक्सिंग आणि अन्य बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी विधी मंत्रालयाने मसुदा तयार केला आहे. (वृत्तसंस्था)