शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविच डेव्हिस चषकाच्या स्वरूपात बदल करण्याच्या बाजूने

By admin | Updated: June 30, 2016 20:44 IST

जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने ११६ वर्षांपूर्वीच्या डेव्हिस चषक स्पर्धेच्या स्वरूपात बदल करण्याचे समर्थन केले आहे.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. ३० : जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने ११६ वर्षांपूर्वीच्या डेव्हिस चषक स्पर्धेच्या स्वरूपात बदल करण्याचे समर्थन केले आहे.टेनिसचा विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेव्हिस चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचची लढत ब्रिटनच्या अँडी मरेशी होणार आहे. मॅराथॉन मॅन नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे यांना आपापल्या संघांना विजय मिळवून देण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघांदरम्यान ब्लॉकबस्टर लढत १५ ते १७ जुलैदरम्यान होणार आहे.जोकोविच म्हणाला, ह्यनिश्चितपणे मी डेव्हिस चषकाच्या स्वरूपात बदल करण्याच्या बाजूचा आहे. या स्वरूपात जास्त खेळ होऊ शकत नाही. युरोपियन चॅम्पियनशिप आणि विश्वचषकात ज्याप्रमाणे फुटबॉलचे स्वरूप असते तसेच स्वरूप टेनिसमध्येही लागू करण्याची आवश्यकता आहे. एक अथवा दोन वर्षांत एकच स्पर्धेचे आयोजन व्हायला हवे. टेनिस वेळापत्रकातही काही अंतर असणे आवश्यक आहे. ज्यामुळे टेनिसपटंूनाच नव्हे तर चाहते आणि मीडियालादेखील त्यावर काम करण्याची संधी मिळेल.ह्णजोकोविचने २00४ मध्ये त्यात पदार्पण केले होते. त्याने डेव्हिस चषकात २0१२ आणि २0१४ मध्ये सहभाग नोंदवला नव्हता. १२ वेळेसचा ग्रँडस्लॅम विजेता जोकोविच म्हणाला, सध्याच्याच पद्धतीने स्पर्धा होत राहिल्यास ती खेळाडूंसाठी योग्य ठरणार नाही. त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे.जोकोविचने बुधवारी फ्रान्सच्या अ‍ॅड्रियन मिनारिनो याचा ६-४, ६-३, ७-६ असा पराभव करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठली. त्याचबरोबर त्याने सलग ३0 सामने जिंकण्याचा विक्रमदेखील आपल्या नावावर केला.