शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई क्रमवारी : भारताचा अव्वल टेनिसपटू; युकी अकराव्या स्थानी

By admin | Updated: July 28, 2016 20:21 IST

डेव्हीस चषक स्पर्धेत केलेल्या कामगिरीला आशियाई क्रमवारीत समावेश करण्याचा निर्णय आशियाई टेनिस संघटनेने (एटीएफ) घेतल्यानंतर भारताच्या साकेत मिनेनी याने

साकेत मिनेनी १२व्या स्थानीनवी दिल्ली : डेव्हीस चषक स्पर्धेत केलेल्या कामगिरीला आशियाई क्रमवारीत समावेश करण्याचा निर्णय आशियाई टेनिस संघटनेने (एटीएफ) घेतल्यानंतर भारताच्या साकेत मिनेनी याने आशियाई क्रमवारीत चांगले स्थान पटकावताना भारताचा अव्वल टेनिसपटू म्हणून स्थान पटकावले.

मिनेनी सध्या ३८६ गुणांसह आशियाई क्रमवारीत ११ व्या स्थानी असून तो अव्वल भारतीय खेळाडू आहे. तर, त्याच्यानंतर बरोबर एका स्थानाने १२व्या स्थानी युकी भांबरी (३८१) असून तो भारताचा द्वितीय क्रमांकाचा खेळाडू ठरला. त्याचवेळी जपानचा केई निशिकोरी तब्बल ४२९० गुणांसह आशियाई क्रमवारीत अव्वल असून जागतिक क्रमवारीत तो सध्या सहाव्या स्थानी आहे.

विशेष म्हणजे, जागतिक क्रमवारीवर नजर टाकल्यास युकी भारताचा अव्वल खेळाडू असून तो जागतिक क्रमवारीत १५१व्या स्थानी आहे. तर, साकेत त्याच्यानंतर १५२ व्या स्थानी विराजमान आहे. चंडिगड येथे कोरियाविरुद्ध झालेल्या आशिया - ओशियाना गटात झालेल्या लढतीत भारताने ४-१ अशी बाजी मारली होती आणि यामध्ये स्एकेरी लढत जिंकताना साकेतने भारतासाठी महत्त्वाची कामगिरी केली होती. त्याचवेळी दुखापतीमुळे युकीने या स्पर्धेतून माघार घेतली होती. दुसरीकडे भारताचा अन्य एक एकेरी खेळाडू रामकुमार रामनाथन जागतिक क्रमवारीत सध्या १९६ व्या स्थानी असून २८७ गुणांसह आशियाई क्रमवारीत १५व्या स्थानी आहे. रामनाथनने डेव्हीस कपमध्ये एक सामना जिंकताना एक सामना गमावला होता. ..........................................एटीएफने आशियाई क्रमवारीमध्ये बदल करताना डेव्हीस चषक स्पर्धा आणि आशियाई टेनिस टूर सामन्यांतील कामगिरींना क्रमवारीमध्ये सामिल करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारीमध्ये आशियाई टेनिस टूर एटीपी सुरु झाल्यानंतर आशियाई क्रमवारी पध्दत बदलण्याची चर्चा झाली. एटीएफनुसार जे खेळाडू एटिएफमध्ये खेळत आहेत, तसेच आशिया - ओशियानामध्ये आपल्या देशासाठी खेळले आहेत, अशा खेळाडूंच्या कामगिरीचा क्रमवारीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. यंदाच्या १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या डेव्हीस चषक विभागीय सामन्यांतील कामगिरीचा क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे.