शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई अजिंक्यपद: भारताचे सहा बॉक्सर्स अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 02:49 IST

शिवा थापाचे कांस्य पदकावर समाधान

बँकॉक : अमित पंघाल (५२ किलो) आणि कविंदरसिंग बिष्ट (५६ किलो) यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सलग दुसऱ्या सुवर्णपदकाकडे वाटचाल करताना अन्य सहा भारतीय खेळाडूंसह गुरुवारी येथे आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपदच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.पंघाल व बिष्ट यांनी प्रभावी कामगिरी केली, पण सलग चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठणाºया शिव थापाचे (६० किलो) आव्हान मात्र संपुष्टात आले. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष विभागात पंघाल व बिष्ट यांच्या व्यतिरिक्त दीपक सिंग (४९ किलो) आणि आशिष कुमार (७५ किलो) यांनी अंतिम फेरी गाठली, तर महिला विभागात पूजा राणी (७५ किलो) आणि सिमरनजित कौर (६४ किलो) शुक्रवारी होणाºया अंतिम लढतीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या.पंघालने चीनच्या हु जियानगुआनचा पराभव केला. बिष्टने उपांत्यपूर्व फेरीत विद्यमान विश्व चॅम्पियन कजाखस्तानच्या काईरात येरालिएवचा पराभव केला. त्यानंतर त्याने मंगोलियाच्या एंख-अमर खाखूला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. दरम्यान या दोन्ही बॉक्सर्सच्या डोळ्याला दुखापत झाली, पण भारतीय बॉक्सर्स ३-२ ने विजय मिळवण्यात यशस्वी ठरले. थापाने २०१५ च्या रौप्यपदक विजेत्या कजाखस्तानच्या जाकिर सैफुलिनविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली, पण अखेरच्या फेरीमध्ये तो कमकुवत पडला आणि शेवटी खंडित निर्णयात त्याला पराभव स्वीकारावा लागला. पुरुष विभागात आशिष (६९ किलो) आणि सतीश कुमार (९१ किलो पेक्षा अधिक) यांनी कांस्यपदक पटकावले. आशिषला उज्बेकिस्तानच्या बोबो उस्मान बातुरोवने ५-० ने पराभूत केले तर सतीशने दुखापतीमुळे कजाखस्तानच कामशिबेक कुनाकाबयेवला पुढे चाल दिली. भारतासाठी दिवसाची सुरुवात चांगली झाली. दीपकला सलग दुसऱ्यांदा वॉकओव्हर मिळाला. कजाखस्तानच्या तेमिरतास झुसुपोवने दुखापतीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रीय चॅम्पियन थेट फायनलसाठी पात्र ठरला. आशिष कुमारने इराणच्या सेयेदशाहिन मौसावीला पुनरागमनाची संधी दिली नाही. महिलांमध्ये मनिषा तायवानच्या हुआंग सियाओ वेनविरुद्ध पराभूत झाली तर सरिताला (६० किलो) चीनच्या यांग वेनलूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. जरीनला व्हिएतनाच्या नगुयेन थी तामविरुद्ध संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागला. पूजाने (७५ किलो) कजाखस्तानच्या फरीजा शोलटेचा पराभव केला तर सिमरनजितने उज्बेकिस्तानच्या माफतुनाखोन मलिवाविरुद्ध ५-० ने विजय मिळवला. (वृत्तसंस्था)महिला विभागात अनुभवी एल. सरिता देवी (६० किलो), गेल्या वेळची रौप्यपदक विजेता मनिषा (५४ किलो), माजी विश्व ज्युनिअर चॅम्पियन निखत जरीन (५१ किलो) आणि विश्व रौप्यपदक विजेता सोनिया चहल (५७ किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

टॅग्स :boxingबॉक्सिंग