शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन : भारताच्या आयुष शेट्टीचे ऐतिहासिक रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 10:13 IST

Asian Championships Badminton : भारताच्या आयुष शेट्टी याला संपूर्ण स्पर्धेत राखलेला धडाका अंतिम सामन्यात कायम राखण्यात अपयश आल्याने त्याला आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, असे असले तरी त्याचे पदक भारतासाठी ऐतिहासिक ठरले.

निंगबो (चीन)  - भारताच्या आयुष शेट्टी याला संपूर्ण स्पर्धेत राखलेला धडाका अंतिम सामन्यात कायम राखण्यात अपयश आल्याने त्याला आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, असे असले तरी त्याचे पदक भारतासाठी ऐतिहासिक ठरले. १९६५ सालानंतर पहिल्यांदाच भारताने या स्पर्धेत एकेरी गटात पदक मिळवले.

जागतिक क्रमवारीत दुसरा असलेला क्रमांक दोन खेळाडू चीनचा विश्वविजेता शी यू की याच्याविरुद्ध आयुषचा ८-२१, १०-२१ असा पराभव झाला. यामुळे भारताचा या स्पर्धेतील पुरुष एकेरीतील सुवर्णपदकाची ६१ वर्षांची प्रतीक्षा कायम राहिली. बिगर मानांकित आयुषसाठी ही स्पर्धा उल्लेखनीय ठरली.

दिनेश खन्ना यांच्यानंतर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो केवळ दुसरा भारतीय पुरुष ठरला. खन्ना यांनी १९६५ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी २०२३ मध्ये पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावले होते.

...असा रंगला सामनापहिल्या गेममध्ये शी याने वर्चस्व गाजवत ४-० अशी आघाडी मिळवली. आयुषच्या स्मॅशमध्ये अचूकता नसल्याने तो २-६ असा पिछाडीवर राहिला. त्यानंतरही शी याने ११-६ अशी आघाडी घेतली. अखेरीस आयुष कडून झालेल्या चुका त्याला महागात पडल्या आणि शी याने पहिला गेम सहज जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये आयुषने दमदार सुरुवात करीत ३-१ अशी आघाडी घेतली. त्याने काही उत्कृष्ट बचाव आणि स्मॅशच्या जोरावर ७-२ अशी आघाडीही मिळवली. मात्र, ही आघाडी टिकवण्यात तो अपयशी ठरला.

शी याने पुनरागमन करीत ७-७ अशी बरोबरी साधली आणि नंतर ११-८ अशी आघाडी घेतली. ही आघाडी त्याने अखेरपर्यंत कायम राखत सामना २१-१० असा जिंकला.

चुकांमुळे झाला पराभवजागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानावर असलेल्या आयुषने दमदार खेळ करीत अंतिम फेरी गाठताना जागतिक क्रमवारीत अव्वल कुनलावुत वितिदसर्न, चौथ्या क्रमांकावरील जोनाथन ख्रिस्ती आणि सातव्या क्रमांकावरील ली शी फेंग यांचा पराभव केला होता. मात्र, शी यू की याच्या शिस्तबद्ध आणि रणनीतीपूर्ण खेळापुढे आयुषचा निभाव लागला नाही. चिनी खेळाडूने पूर्ण नियंत्रण ठेवत नेटजवळील खेळात वर्चस्व गाजवले आणि आयुषला चुका करण्यास भाग पाडले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ayush Shetty's historic silver medal at Asia Badminton Championship.

Web Summary : Ayush Shetty secured a historic silver at the Asia Badminton Championship, a first for India in singles since 1965. He lost to China's Shi Yu Qi in the final, ending India's 61-year wait for gold. Shetty's impressive run included defeating top-ranked players.
टॅग्स :BadmintonBadminton