शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई बॉक्सिंग: कविंदरने विश्वविजेत्या कैराटला दिला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 03:14 IST

अमित पांघल, सोनियाचीही उपांत्य फेरीत धडक

बँकॉक : कविंदरसिंग बिश्त याने ५६ किलो गटात विश्वविजेत्या कैराट येरालियेवला नमवून आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत एक पदक निश्चित केले. ५२ किलो गटात अमित पांघल याने आॅलिम्पिक विजेता हसनबोय दुस्मातोव याच्यावर मात करीत उपांत्य फेरी गाठली. महिलांच्या ५७ किलो गटात सोनिया चहलही उपांत्य फेरीत दाखल झाली आहे.बिश्तने गुणविभागणीद्वारे झालेल्या निर्णयात कझाखस्तानचा कैराटवर मात करीत आशियाई स्पर्धेचे पहिले पदक निश्चित केले. कैराटने मागच्यावर्षी याच स्पर्धेत कांस्य जिंकले होते. २०१५ साली येथे पदक जिंकणाऱ्या अमितने हसनबोयचा ३-२ असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही अमितने उझबेकिस्तानच्या या खेळाडूला नमवून सुवर्ण जिंकले होते. विश्व चॅम्पियनशिपची रौप्य विजेती सोनियाने कोरियाची सोन वा हिच्यावर विजय साजरा केला. ४९ किलो गटात अफगाणिस्तानच्या रामिश रहमानीकडून चाल मिळाल्याने दीपक सिंगने उपांत्य फेरीत कूच केली.विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती लवलिना बोर्गेहेन हिला ६९ किलो गटात विश्व चॅम्पियन तायवानची चेन नियेन चीन हिने पराभवाची चव चाखवली. महिलांच्या अन्य एका लढतीत सीमा पुनियाला(८१ किलो) मात्र चीनची यांग शियोलीकडून ५-० ने पराभवाचा धक्का बसला. दिवसाच्या अखेरच्या लढतीत भारतीय खेळाडू रोहित टोकस याने ६४ किलो वजन गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाचा शिजोरिंग बतारसुख याच्याविरुद्ध कडवी झुंज दिली. पण तो अखेर २-३ ने पराभूत झाला.

टॅग्स :boxingबॉक्सिंग