शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

एशियन बीच गेम्सचे यजमानपद नाकारले, गोवा सरकारचा ‘यू टर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 05:55 IST

जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या असलेल्या आकर्षणामुळे २०२०मध्ये होणा-या ‘एशियन बीच गेम्स’ स्पर्धेचे यजमानपद गोव्याला बहाल करण्यात आले होते. गोव्यानेही त्यासाठी प्रयत्न केले होते. अखेर ‘आयओए’नी ही संधी मिळवून दिली होती.

- सचिन कोरडेपणजी : जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या असलेल्या आकर्षणामुळे २०२०मध्ये होणा-या ‘एशियन बीच गेम्स’ स्पर्धेचे यजमानपद गोव्याला बहाल करण्यात आले होते. गोव्यानेही त्यासाठी प्रयत्न केले होते. अखेर ‘आयओए’नी ही संधी मिळवून दिली होती. मात्र, आता सरकारी अनास्थेपोटी ही स्पर्धा गोव्याने गमावली असून काही कारणास्तव आम्ही ही स्पर्धा आयोजित करू शकत नसल्याचे कारण पुढे करीत गोवा सरकारने भारतीय आॅलिम्पिक संघटनेला (आयओए) पत्र पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनीदिली. त्यामुळे आता ही स्पर्धागोव्यात होणार नाही, हे निश्चित झाले आहे.गोवा सरकारने ‘आयओए’ला पत्र पाठवून ही स्पर्धा दुसरीकडे खेळविण्याची विनंती केली आहे. स्पर्धेसाठी आयओएकडे मुंबई, चेन्नई आणि केरळचे पर्याय होते. मात्र, गोवा सरकारच्या उत्साहामुळे आयओएचा गोव्यावर भर होता. आयओएच्या बैठकीत त्यास मंजुरी दिली गेली होती. त्यानंतर गोवा सरकारही सकारात्मक होते. स्पर्धेची तारीख निश्चित करण्यासाठी चर्चाही सुरू झाली असताना गोवा सरकारने अचानक यू टर्न घेतला आणि आपण हीस्पर्धा आयोजित करू शकतनसल्याचे पत्र आयओएलापाठवले.बत्रांनी केले होते शिक्कामोर्तबगोव्याने यजमानपदासाठी आयओएकडे पत्र पाठविले होते. आयओएचे अध्यक्ष नरींदर बत्रा आणि नवनियुक्त सचिव राजीव मेहता यांनी कार्यभार स्वीकारताच पहिली बैठक दिल्लीत घेतली. त्या बैठकीत २०२०मध्ये होणाºया एशियन बीच गेम्स आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांवर चर्चा झाली होती. आशियाई बीच गेम्स गोव्यात व्हाव्यात, अशी प्राथमिकता आयओएची होती. यापूर्वी स्पर्धा स्थळांवर चर्चासुद्धा झाली होती. त्यात मुंबईनंतर गोव्याचे नाव आघाडीवर होते. देश-विदेशातील खेळाडू गोव्यात येण्यास उत्सुक आहेत. गोव्यात बीच गेम्ससाठी साधनसुविधा आणि पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्याला मंजुरी देण्यात आली होती, असे एका पदाधिकाºयाने सांगितले.क्रीडा आणि पर्यटनालाही होता वाव...ही स्पर्धा ‘आॅलिम्पिक काउंसिल आॅफ एशिया’ आयोजित करते. याआधी, ही स्पर्धा व्हिएतनामने आयोजित केली होती. त्यात ४१ आशियाई संघांच्या एकूण २ हजार खेळाडूंनी भाग घेतला होता. पहिली स्पर्धा बाली येथे २००८मध्ये झाली होती. एवढ्या मोठ्या स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्याची संधी गोव्याला प्रथमच मिळणार होती. या स्पर्धेमुळे गोव्याला क्रीडा क्षेत्रासह पर्यटनातही मोठा वाव होता. जगभरातील खेळाडू यानिमित्त गोव्यात आले असते. विशेष म्हणजे, सध्या क्रीडा आणि पर्यटन ही दोन्ही खाती मनोहर आजगावकर यांच्याकडेच आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा