शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसी क्रमवारीत अश्विन-जडेजाने रचला इतिहास, दोघंही अव्वल

By admin | Updated: March 8, 2017 14:53 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये भारताच्या फिरकी जोडीने इतिहास रचला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये भारताच्या फिरकी जोडीने इतिहास रचला आहे. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोघांनीही आयसीसीच्या क्रमवारीत संयुक्तरित्या अव्वल स्थान काबिज केलं आहे. आयसीसी क्रमवारीत दोन्ही फिरकी गोलंदाजांनी सारखे गुण मिळवून अव्वल स्थान गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा दोघांनाही 892 रेटिंग मिळाले आहेत.  त्यांच्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा जॉश हेझलवूड (863) आणि त्यानंतर श्रीलंकेचा रंगना हेराथ  (827) आहे.  बंगळुरूमध्ये झालेल्या दुस-या कसोटीत अश्विनने 8 विकेट घेतल्या होत्या तर जडेजाने 7 विकेट घेतल्या होत्या.  
यापुर्वी एप्रिल 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आणि मुथय्या मुरलीधरन संयुक्तरित्या एक नंबरवर होते. पण दोन फिरकी गोलंदाजांनी संयुक्तरित्या अव्वल स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 
 
मात्र, फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीला कांगारूंविरूद्धच्या दोन सामन्यात लवकर बाद होण्याचा फटका बसला. दुस-या स्थावरून तिस-या स्थानावर त्याची घसरण झाली. ऑस्ट्रेलियाचा स्मिथ या क्रमवारीत अव्वल आहे तर त्याच्याखाली न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा नंबर आहे.   
 
दुसरीकडे, अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत आर.अश्विनची एका स्थानाने घसरण होऊन तो दुस-या क्रमांकावर आला आहे. बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने पहिलं स्थान मिळवलं असून त्याचे 441 रेटिंग आहेत.