शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आश्विन गोलंदाजीतील डॉन ब्रॅडमन - स्टीव्ह वॉ

By admin | Updated: February 15, 2017 00:33 IST

आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनवर स्तुतिसुमने उधळली आहेत. अश्विनला त्याने ‘गोलंदाजीतील ब्रॅडमन’

मोनाको : आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनवर स्तुतिसुमने उधळली आहेत. अश्विनला त्याने ‘गोलंदाजीतील ब्रॅडमन’ संबोधले आहे. आगामी कसोटी मालिकेत अश्विनचा मारा कसा खेळायचा, याचे उत्तर आॅस्ट्रेलियन संघाला शोधावे लागेल, असेही वॉ म्हणाला. वॉ म्हणाला,‘आॅस्ट्रेलियाला दडपणाखाली मनोधैर्य खचणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. अश्विन गोलंदाजीमध्ये ब्रॅडमन आहे. तो दिग्गज खेळाडू आहे. अश्विनच्या गोलंदाजीला यशस्वीपणे सामोरे जाण्याचा मंत्र सापडला तर आॅस्ट्रेलियाला या मालिकेत संधी राहील.’भारतीय फिरकीपटूची प्रशंसा करताना वॉ म्हणाला,‘अश्विनची सध्याची कामगिरी बघता तो भविष्यात अनेक विक्रम नोंदविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अश्विनची आकडेवारी शानदार आहे.’आॅस्ट्रेलियापुढे कडवे आव्हानवॉ म्हणाला, आॅस्ट्रेलियासाठी ही मालिका खडतर ठरणार आहे. कारण भारताचा संघ समतोल असून कोहलीचे नेतृत्व शानदार आहे. भारतीय संघ सध्या चांगला खेळ करीत आहे. सर्व खेळाडू आपली भूमिका चोख बजावत असून ते मायदेशात खेळत आहेत. भारताला भारतात पराभूत करणे कठीण असून गेल्या काही वर्षांत त्याची प्रचिती आली आहे. विराट चांगले नेतृत्व करीत असून खेळाडू सकारात्मक आहेत.’ (वृत्तसंस्था) सौरवचे मत चुकीचेभारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय संघ आॅस्ट्रेलियाला ४-० ने धूळ चारेल असे भाकीत वर्तविले आहे. वॉच्या मते आॅस्ट्रेलिया संघाला कमी लेखणे चुकीचे ठरेल. वॉ म्हणाला,‘आॅस्ट्रेलिया तुल्यबळ संघ असून भारतीय संघाची परीक्षा घेण्यास सक्षम आहे. संघातील अनेक खेळाडूंची भारतीय संघाला माहिती नाही. त्याचा आॅस्ट्रेलियाला लाभ मिळेल. पहिला कसोटी सामना महत्त्वाचा ठरले. आॅस्ट्रेलिया संघ चांगली सुरुवात करण्यात यशस्वी ठरला तर काहीही घडू शकते.’विदेशात आॅस्ट्रेलिया संघाची कामगिरी निराशाजनक का होत आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. हा जागतिक खेळ आहे. तटस्थ पंच असतात. विदेशात निराशाजनक कामगिरीचे कारण कळले नाही. कदाचित नकारात्मक मानसिकता यासाठी कारणीभूत असावी, असेही वॉ म्हणाला.