शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आशिष नेहरा की मोहम्मद शमी?

By admin | Updated: April 24, 2017 00:55 IST

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यासाठी भारतीय निवड समितीची ज्या वेळी बैठक होईल, त्या वेळी गोलंदाजांची

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यासाठी भारतीय निवड समितीची ज्या वेळी बैठक होईल, त्या वेळी गोलंदाजांची निवड ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठी आशिष नेहरा व मोहम्मद शमी हे दोघेही दावेदार आहेत.आयसीसीने ब्रिटनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ सदस्यांच्या संघाची निवड करण्यासाठी २५ एप्रिल ही अखेरची मुदत दिली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये संघाची निवड होणार असल्याचे निश्चित आहे. निवड समितीच्या बैठकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. कारण मिळकतीमध्ये भागीदारी व प्रशासन या आयसीसीसोबत जुळलेल्या मुद्यावर तोडगा निघावा, असे बीसीसीआयचे मत आहे. रविचंद्रन आश्विन आगामी काही आठवड्यांमध्ये सरावाला सुरुवात करेल, अशी आशा आहे. त्याची व रवींद्र जडेजाची फिरकीपटू म्हणून निवड होणार असल्याचे निश्चित आहे, पण चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या निवडीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ ब्रिटनमध्ये दाखल झाल्यानंतर दोन सराव सामने खेळणार आहे. आश्विनला त्या वेळी सरावाची संधी मिळणार आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह, स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार व वेगाचा बादशाह उमेश यादव हे फिट असतील, तर १५ सदस्यांच्या संघात निवड पक्की मानली जात आहे. त्याचप्रमाणे हार्दिक पांड्याची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड होणे निश्चित आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजाची एक जागा रिक्त आहे. त्यासाठी मोहम्मद शमी व आशिष नेहरा दावेदार आहेत. (वृत्तसंस्था)