शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

लंकेत आश्विनचा डंका!

By admin | Updated: August 13, 2015 08:47 IST

आॅफ स्पिनर रवीचंद्रन आश्विनची गोलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरीपाठोपाठ (४६ धावांत ६ बळी) शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारताने बुधवारपासून सुरू झालेल्या

गाले : आॅफ स्पिनर रवीचंद्रन आश्विनची गोलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरीपाठोपाठ (४६ धावांत ६ बळी) शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारताने बुधवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंकेला १८३ धावांत गारद केले. त्यानंतर २ बाद १२८ पर्यंत मजल गाठून वर्चस्व मिळविले. आश्विनने लंकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत ४६ धावांत सहा फलंदाज बाद केले. त्यामुळे यजमान संघाचा डाव ४९.४ षटकांत आटोपला. अमित मिश्राने २० धावांत दोन गडी बाद केले. लंकेकडून कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक ६४ धावा केल्या. यष्टिरक्षक दिनेश चांदीमलने ५९ धावांचे योगदान दिले. ६० धावांत अर्धा संघ बाद झाल्यानंतर या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ७९ धावांची भागीदारी करीत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. भारताने सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद ५३ आणि कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ४५ धावांच्या बळावर दिवसअखेर २ बाद १२८ अशी वाटचाल केली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी आतापर्यंत १०० धावांची भागीदारी केली आहे. धवनने १०३ चेंडू टोलवीत सहा चौकार मारले. कोहलीने ७७ चेंडूंचा सामना केला. त्याचे सात चौकार आहेत. भारत लंकेच्या तुलनेत ५५ धावांनी मागे असून, आठ फलंदाज शिल्लक आहेत. भारताची सुरुवात खराब झाली. दहाव्या षटकापर्यंत २८ धावांत लोकेश राहुल ७ आणि रोहित शर्मा ९ हे बाद झाले होते. धवन आणि कोहली यांनी नंतर खेळाची सूत्रे स्वत:कडे घेत २७ व्या षटकात शंभर धावा फळ्यावर लावल्या. धवनने ९२ चेंडू खेळून स्वत:चे अर्धशतकही गाठले. त्याआधी गालेची खेळपट्टी कोरडी असल्याने लंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली, पण त्यांचा निर्णय फसला. संघाने पहिल्या २३ षटकांत ६३ धावांत पाच आणि नंतर दुसऱ्या सत्रात २६.४ षटकांत ११८ धावांत पाच गडी गमावले. आश्विनने तिसऱ्याच चेंडूवर कुमार संगकारा(५) याला जाळ्यात अडकविले. तो दुसऱ्या कसोटीनंतर निवृत्त होणार आहे. यानंतर अश्विनने पाठोपाठ धक्के देत करिअरमध्ये ११ व्यांदा पाचपेक्षा अधिक गडी बाद करण्याची कामगिरी केली. (वृत्तसंस्था)धावफलकश्रीलंका पहिला डाव : दिमुथ करुणारत्ने झे. रहाणे गो. ईशांत ९, कौशल सिल्व्हा झे. धवन गो. अ‍ॅरॉन ५, लाहिरू थिरीमाने झे. रहाणे गो. आश्विन १३, कुमार संगकारा झे. राहुल गो. अश्विन ५, अँजेलो मॅथ्यूज झे. रोहित गो. अश्विन ६४, जेहान मुबारक झे. राहुल गो. अश्विन ००, दिनेश चंडीमल झे. रहाणे गो. मिश्रा ५९, धम्मिका प्रसाद पायचित गो. अश्विन ००, रंगाना हेराथ त्रि. गो. अश्विन २३, थारिंडु कौशल झे. रोहित गो. मिश्रा ००, नुवान प्रदीप नाबाद ००. अवांतर : ५, एकूण : ४९.४ षटकांत सर्व बाद १८३. गडी बाद क्रम : १/१५, २/१५, ३/२७, ४/५४, ५/६०, ६/१३९, ७/१५५, ८/१७९, ९/१७९, १०/१८३. गोलंदाजी : ईशांत ११-३-३०-१, अ‍ॅरॉन ११-०-६८-१, अश्विन १३.४-२-४६-६, मिश्रा ६-१-२०-२, हरभजन ८-१-१७-०.भारत पहिला डाव : लोकेश राहुल पायचित गो. प्रसाद ७, शिखर धवन खेळत आहे ५३, रोहित शर्मा पायचित गो. मॅथ्यूज ९, विराट कोहली खेळत आहे ४५, अवांतर : १४, एकूण : ३४ षटकांत २ बाद १२८, गडी बाद क्रम : १/१४, २/२८. गोलंदाजी : प्रसाद ७-०-२२-१, प्रदीप ८-१-३२-०, मॅथ्यूज ४-१-१२-१, कौशल ८-०-४१-०, हेराथ ७-१-१५-०.