शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आर्याना सबालेन्का अजिंक्य

By admin | Updated: December 27, 2015 02:30 IST

डेक्कन जिमखाना क्लबतर्फे आयोजित १५ व्या २५ हजार डॉलर पुरस्काराच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत बेलारूसच्या आर्याना सबालेन्का हिने रशियाच्या व्हिक्टोरिया कामशेकाया

पुणे : डेक्कन जिमखाना क्लबतर्फे आयोजित १५ व्या २५ हजार डॉलर पुरस्काराच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत बेलारूसच्या आर्याना सबालेन्का हिने रशियाच्या व्हिक्टोरिया कामशेकाया हिचा ६-३, ६-४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टावर हा सामना झाला. आर्यानाने केवळ ६४ मिनिटांमध्ये सामना खिशात घातला. अंतिम सामन्याच्या पहिल्या गेममध्ये व्हिक्टोरियाने आर्यानाची सर्व्हिस भेदली तर, दुसऱ्या गेममध्ये आर्यानाने व्हिक्टोरियाची सर्व्हिस बे्रक केली. तिसरा गेम ड्यूसपर्यंत रंगला व यात आर्यानाने आपली सर्व्हिस राखली. चौथ्या गेममध्ये आर्यानाने व्हिक्टोरियाची सव्हिस बे्रक करून ४-१ अशी आघाडी घेतली. उंचापुऱ्या आर्यानाने कोर्टच्या तिरकस मारलेले फटके व ताकदवान बॅकहँड याच्यासमोर व्हिक्टोरियाकडे उत्तर नव्हते. यानंतरच्या गेममधील सर्व्हिस दोन्ही खेळाडूंनी राखल्या. आर्यानाने केवळ २६ मिनिटांमध्ये पहिला सेट ६-३ असा जिंकून विजयाची पायाभरणी केली. दुसऱ्या सेटच्या पाचव्या गेममध्ये आर्यानाने व्हिक्टोरियाची सव्हिस बे्रक केली व सहाव्या गेममध्ये आपली सर्व्हिस राखून ४-२ अशी आघाडी घेतली. व्हिक्टोरियाने सामन्यात कमबॅक करताना सलग दोन गेम जिंकून ४-४ अशी बरोबरी केली. आर्यानाने नवव्या गेममध्ये व्हिक्टोरियाची सर्व्हिस बे्रक केली व दहाव्या गेममध्ये आपली सर्व्हिस राखून ३८ मिनिटांमध्ये हा सेट ६-४ असा जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली. (क्रीडा प्रतिनिधी)