शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अरुण यांच्यामुळे चुका सुधारण्यास मदत झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:22 IST

माझ्या वेगवान माऱ्यात काही उणिवा होत्या. गोलंदाज कोच भरत अरुण यांनी स्वत:च्या पहिल्या कार्यकाळात या उणिवा दूर करण्यास मदत केली, असे मत वेगवान

नवी दिल्ली : माझ्या वेगवान माऱ्यात काही उणिवा होत्या. गोलंदाज कोच भरत अरुण यांनी स्वत:च्या पहिल्या कार्यकाळात या उणिवा दूर करण्यास मदत केली, असे मत वेगवान गोलंदाज उमेश यादव याने व्यक्त केले.मुख्य कोच रवी शास्त्री यांच्या पसंतीनुसार अरुण यांना टीम इंडियासोबत गोलंदाजी कोच म्हणून दुसरा कार्यकाल बहाल करण्यात आला आहे. ते पुढील दोन वर्षे संघासोबत असतील. या पार्श्वभूमीवर स्थानिक कसोटी सत्रात सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या उमेशने यशाचे श्रेय अरुण यांच्या परिश्रमांना दिले. एका मुलाखतीत उमेश म्हणाला, ‘मागचे सत्र कसोटी क्रिकेटमध्ये माझ्यासाठी ‘लकी’ ठरले. मी सातत्यपूर्ण मारा केला. या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी मला अरुण यांनी प्रोत्साहन देत चुका सुधारण्यास मदत केली. या यशाचे श्रेय त्यांनादेखील जाते.’उमेशने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १७ गडी बाद केले. चार कसोटी सामन्यांत कुठल्याही वेगवान भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी उमेश मानसिक तयारी करीत आहे. सरावात उमेश ‘एसजी’ऐवजी ‘कुकाबुरा’ चेंडूने गोलंदाजी करीत आहे. पाटा खेळपट्ट्यांवर कुकाबुरा चेंडू आव्हानात्मक असतो, असे सांगून उमेश म्हणाला, ‘कुकाबुरा चेंडू २५ षटकांनंतर चांगलाच जुना होतो. लाल कुकाबुरा चेंडूने पहिल्या १५ षटकांत बळी घेता येतात. तथापि चेंडूचे सीम थोडे घासले गेल्यास पाटा खेळपट्टीवर हा चेंडू अधिक आव्हानात्मक बनतो.’ (वृत्तसंस्था)मी संघात असताना कधी आत, तर कधी बाहेर बसत होतो. या काळात गोलंदाजीतील उणिवा शोधल्या आणि त्या दूर केल्यामुळे चांगले निकाल पाहायला मिळाले. अंतिम एकादशमध्ये नसायचो त्या वेळी अरुण नेट्समध्ये माझ्यासोबत तासन्तास वेळ घालवित होते.नागपुरात वास्तव्यास असायचो तेव्हा हेच काम माजी वेगवान गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी करीत असत. दोघांनीही माझे तंत्र सुधारण्यावर परिश्रम घेतल्याने मी दोघांचाही सदैव ऋणी असल्याचे उमेशने सांगितले.