अरणचा सागर जाधव माण खटाव केसरीचा मानकरी
By admin | Updated: September 12, 2014 22:51 IST
अरण: नरवणे (ता़ माण) येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित माण खटाव केसरी कुस्ती स्पर्धेत अरणचा मल्ल सागर जाधव याने कवठे महांकाळच्या समाधान काळे याला अस्मान दाखविल़े या विजयामुळे सागरला मानाची 2 किलो चांदीची गदा व 21 हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आल़े
अरणचा सागर जाधव माण खटाव केसरीचा मानकरी
अरण: नरवणे (ता़ माण) येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित माण खटाव केसरी कुस्ती स्पर्धेत अरणचा मल्ल सागर जाधव याने कवठे महांकाळच्या समाधान काळे याला अस्मान दाखविल़े या विजयामुळे सागरला मानाची 2 किलो चांदीची गदा व 21 हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आल़ेया यशाबद्दल सागर जाधव याचा अरण येथे नागरी सत्कार करण्यात आला़ यावेळी पंचायत समिती विरोधी पक्षनेते भारत शिंदे, किसन जाधव, महाराष्ट्र केसरी अस्लम काझी, संतोष दुरवड, सुनील शेवतकर, ज्ञानेश्वर गंगेकर, हसन पटेल, भीमराव रणदिवे, उत्तमराव सावंत, यशवंत शिंदे, संजय पाटील, अंकुश जाधव, समाधान जाधव, दिग्विजय पाटील आदी उपस्थित होत़ेअरण तालीम मंडळाच्या वतीने सागर जाधवचा सत्कार करण्यात आला़ यावेळी बालाजी रणदिवे, बंडू रणदिवे, प्रकाश रणदिवे, शिवाजी शेळके, लालासाहेब धिरतोडे आदी उपस्थित होत़ेफोटोओळी-माण खटाव केसरीचा मानकरी अरणचा मल्ल सागर जाधवचा अरण ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला़ त्यावेळी भारत शिंदे, अस्लम काझी, किसन जाधव, रामभाऊ जाधव, उत्तमराव सावंत आदी़