अर्जेंटिना १
By admin | Updated: June 20, 2014 21:24 IST
जर अर्जेंटिनाने हा सामने जिंकला तर ते सहा गुणांसह अव्वलस्थानी जातील आणि त्याचबरोबर त्यांचा अंतिम १६ संघातील स्थानही पक्के होणार आहे. डिएगो मॅराडोनानंतर अर्जंेटिनाचा सवार्ेत्तम खेळाडू मानला जाणारा मेस्सी वर्ल्डकप जिंकण्यास आतुर आहे. बार्सिलोनासाठी त्याचे शानदार रेकॉर्ड आहे; परंतु आपल्या शानदार कामगिरीत तो वर्ल्डकपच ताजही जोडू इच्छित आहे. त्यामुळे त्याने इराणविरुद्ध आक्रमक खेळण्याची वकिली केली आहे.
अर्जेंटिना १
जर अर्जेंटिनाने हा सामने जिंकला तर ते सहा गुणांसह अव्वलस्थानी जातील आणि त्याचबरोबर त्यांचा अंतिम १६ संघातील स्थानही पक्के होणार आहे. डिएगो मॅराडोनानंतर अर्जंेटिनाचा सवार्ेत्तम खेळाडू मानला जाणारा मेस्सी वर्ल्डकप जिंकण्यास आतुर आहे. बार्सिलोनासाठी त्याचे शानदार रेकॉर्ड आहे; परंतु आपल्या शानदार कामगिरीत तो वर्ल्डकपच ताजही जोडू इच्छित आहे. त्यामुळे त्याने इराणविरुद्ध आक्रमक खेळण्याची वकिली केली आहे.मेस्सी म्हणाला, 'बोस्नियाविरुद्ध उत्तरार्धात केलेल्या कामगिरीचीच पुनरावृत्ती करण्याची आम्हाला गरज आहे. आम्हाला जास्त संधी असते आणि फॉरवर्ड लाईनमध्ये चांगला समन्वय असतो.'दुसरीकडे इराणचा विंगर अश्कान देजागाह आणि स्ट्रायकर रेज गुजानेजाद यांच्यासाठी फार कमी वाव असण्याची शक्यता आहे; परंतु तरीही ते अर्जेंटिनाचा डिफेन्स भेदण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचा प्रयत्न करतील.इराणला वर्ल्डकपमध्ये एकमेव विजय १९९८ मध्ये अमेरिकेविरुद्ध मिळाला होता; परंतु स्पर्धेत होणार्या खळबळजनक निकालापासून ते प्रेरणा घेऊ शकतात. चिली स्पेनला धोबीपछाड देऊ शकते, कोस्टारिका उरुग्वेला धूळ चारूशकतो तर इराण अर्जेंटिनालाविरुद्ध सनसनाटी विजय का मिळवू शकत नाही. तथापि, हे शक्य वाटत नाही. कारण इराणकडे आक्रमणफळीत हवे तसे नाही; परंतु तरीदेखील कमीत कमी ही कल्पना तर संघ करूच शकतो.