शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तिरंदाजी - दीपिकाकुमारी आणि बोंबायला उपउपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: August 11, 2016 05:44 IST

भारतीय तिरंदाज लैशराम बोंबायलादेवी आणि दीपिका कुमारीने बुधवारी ऑलिम्पिकच्या महिला वैयक्तिक रिकर्व्ह गटात उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. ११ : भारतीय तिरंदाज लैशराम बोंबायलादेवी आणि दीपिका कुमारीने बुधवारी ऑलिम्पिकच्या महिला वैयक्तिक रिकर्व्ह गटात उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 'राऊंड ऑफ ६४' च्या सामन्यात बोंबायलाने ऑस्ट्रियाच्या लॉरेन्स बेलडॉफवर ६-२ असा विजय साजरा तर दीपिका कुमारीने जॉर्जियाच्या क्रिस्टीनचा ६-४ ने पराभऴ केला. 'राऊंड ऑफ ६४' सामन्यातील विजयानंतर बोंबायला आणि दीपिका कुमारीने राऊंड ऑफ ३२ मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना प्री कॉर्टर फायनल (उप उपांत्यपूर्व) फेरीत प्रवेश मिळवला आहे. काही मिनिटांच्या फरकाने खेळविण्यात आलेल्या दोन्ही लढतीत बोंबायला आणि दीपिकाने उत्कृष्ट कामगिरीसह उपाउपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे. 'राऊंड ऑफ ३२' च्या सामन्यात बोंबायला तैपेईची लिन शिह चियाचा ६-२ अशा फरकाने पराभव केला. तर दीपिकाकुमारीने इटलीच्या सार्तोरीचा ६-२ अशा फरकाने पराभव केला. बोंबायलाने बेलडॉफविरुद्ध पहिला सेट गमाविल्यानंतर शानदार कामगिरीसह पुढील तिन्ही सेट जिंकले. पहिला सेट तिने २४-२७ ने गमाविला होता. नंतर मात्र २८-२४, २७-२३ आणि २६-२४ असे गुण नोंदविले. दुसऱ्या सेटमध्ये बोंबायलाने १०, ९, ९ तसेच तिसऱ्या सेटमध्ये ९, ९, ९ गुणांचा वेध घेतला. चौथ्या सेटमध्ये ९, ९ आणि ८ गुण नोंदविले. ऑस्ट्रियाच्या खेळाडूला पहिल्या सेटमधील कामगिरीची लय कायम राखण्यात मात्र अपयश आले.

बोंबायलाने दुसऱ्या सामन्यात तैपेईची चिया हिच्यावर २७-२४, २७-२४, २८-२६ असा विजय साजरा केला. बोंबायलाने चारही सेटमध्ये प्रत्येकी एकदा १० गुण नोंदवित कमाल केली. चियाने तिसऱ्या सेटमध्ये लागोपाठ दोनदा १० गुणांचा वेध घेताच चुरस निर्माण झाली होती. पण बोंबायलाने चौथ्या सेटमध्ये २८-२६ अशी दोन गुणांची आघाडी घेत पुढील फेरीत स्थान निश्चित केले. राऊंड ऑफ ६४ दीपिकाकुमारीने पहिल्या सेटमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना २७-२६ असा विजय मिळवला. तर दुसरा सेट बरोबरीत सुटला. त्यांनतर तिसरा सेट ३० -२७ जिंकत सामन्यात वर्चस्व राखले. चौथ्या सेटमध्ये जॉर्जियाच्या क्रिस्टीनने दमदार पुनराग्मन करत दीपिकाकमुरीचा असा २९-२७ पराभव केला. पाचव्या सेटमध्ये दीपिकाने दमदार पुनराग्मन करत सामना टाय केला. जॉर्जियाच्या क्रिस्टीनचा पराभव करून भारताच्या दीपिका कुमारीचा राऊंड ३२ फेरीत प्रवेश केला. राऊंड ऑफ ३२ च्या सामन्यात दीपिकाकुमारीला इटलीच्या सार्तोरी विरुद्ध पहिल्या सेटमध्ये २७-२४ असा पराभव पत्कारावा लागल्यानंतर शानदार कामगिरीसह पुढील ३ सेटमध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन करत सलग ३ सेट जिंकले. राऊंड ऑफ ३२च्या सामन्यात दीपिकाने इटलीच्या सार्तोरीचा ६-२ अशा फरकाने पराभव करत उप उपांत्यापुर्व फेरीत प्रवेश केला आहे.