शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

तिरंदाजी प्रशिक्षक सुनीलकुमार निलंबित, विश्व स्पर्धेत इंग्लंडच्या महिला खेळाडूंची छेड काढल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:03 IST

आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अर्जेंटिनामध्ये झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत प्रशिक्षकाच्या गैरवर्तनामुळे भारताचे नाव खराब झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक सुनीलकुमार यांच्यावर इंग्लंडच्या महिला तिरंदाजांची छेड काढल्याचा आरोप...

 कोलकाता : आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अर्जेंटिनामध्ये झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत प्रशिक्षकाच्या गैरवर्तनामुळे भारताचे नाव खराब झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक सुनीलकुमार यांच्यावर इंग्लंडच्या महिला तिरंदाजांची छेड काढल्याचा आरोप लावण्यात आला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, स्पर्धा आयोजकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कुमार यांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला. शिवाय या प्रकरणाची माहिती मिळताच भारतीय तिरंदाजी संघटनेने सुनीलकुमार यांना लगेच निलंबित केले, तसेच कुमार यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेशही दिले आहेत.२ ते ८ आॅक्टोबरदरम्यान अर्जेंटिनाच्या रोसारियो शहरात झालेल्या या स्पर्धेत जमशेदपूरहून टाटा तिरंदाजी अकादमीचे प्रशिक्षक राम अवधेश आणि तिरंदाज अंकिता भगत हेही सहभागी झाले होते. या स्पर्धेत अंकिताने मिश्र स्पर्धेत सुवर्ण पटकावण्याची कामगिरी केली होती. सुनीलकुमार यांच्याविरुद्ध इंग्लंडच्या महिला तिरंदाजांनी आपल्या संघव्यवस्थापकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर व्यवस्थापकाने ही बाब स्पर्धा आयोजकांना सांगितली. ही माहिती कळताच आयोजकांनी लगेच कुमार यांना देश सोडून जाण्यास सांगितले. हरियानाचे रहिवासी असलेले सुनीलकुमार कंपाऊंड संघाचे प्रशिक्षक असून अर्जुन पुरस्कारविजेता तिरंदाज संदीप कुमारचे वैयक्तिक प्रशिक्षकही आहेत. दरम्यान, याप्रकरणी सुनीलकुमार यांच्याशी संपर्क करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच, सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, सुनील यांनी संघव्यवस्थापक सत्यदेव कुमार यांच्यासमक्ष आपली चूक मान्य केली. त्यांनी याप्रकरणी पत्राद्वारे सांगितले, ‘माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. यामुळे सर्वांना अडचणींना सामोरे जावे लागले. यासाठी मी सर्वांची माफी मागतो. मला येथून घरी पाठविण्यात येत असून मी सुरक्षितपणे घरी पोहोचेल.’ (वृत्तसंस्था)या दुर्दैवी घटनेची अजून चौकशी होत आहे. जागतिक तिरंदाजी संघटना याप्रकरणी काहीही बोलण्यास अद्याप सक्षम नाही. स्पोटर््स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) याप्रकरणी हरियाना पोलिसांना पत्राद्वारे या प्रकरणाची माहिती देत आहे. याप्रकरणी सुनीलविरुद्ध कडक कारवाई करण्याची विनंती ‘साई’ हरियाना पोलिसांना करेल.- ख्रिस वेल्स, जागतिक तिरंदाजी संघटना प्रतिनिधी

टॅग्स :Sportsक्रीडा