शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्वीचा विश्वविक्रमी ‘सुवर्ण’वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 05:35 IST

विश्वचषक नेमबाजी । दहा मीटर एअर रायफलमध्ये वर्चस्व

नवी दिल्ली : भारताची स्टार नेमबाज अपूर्वी चंदेला हिने शनिवारी कर्णिसिंग शुटिंग रेंजवर सुरू झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात पहिल्याच दिवशी महिलांच्या दहा मीटर एअर रायफल नेमबाजीत विश्व विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली.

अपूर्वीने २५२.९ गुणांच्या शानदार कामगिरीसह अव्वल स्थान पटकविले. चीनची रूओझू झाओ २५१.८ गुणांसह दुसऱ्या आणि तिची सहकारी ज्यू होंग २३०.४ गुणांसह तिसºया स्थानी राहिली. आठ महिलांच्या अंतिम लढतीत अपूर्वीने रौप्य विजेत्या खेळाडूच्या तुलनेत १.१ गुण अधिक घेतले. अपूर्वीने मागच्या विश्व चॅम्पियनशिपमधील देदीप्यमान कामगिरीच्या बळावर आगामी टोकियो आॅलिम्पिकची आधीच पात्रता मिळविली आहे. रविवारी पात्रता फेरीत तिने ६२९.३ गुणांची कमाई करीत चौथे स्थान घेतले होते.

अपूवीर्ची सुरुवात निराशाजनक होती. पहिल्या फेरीनंतर ती सातव्या स्थानी होती, परंतु तिने जबरदस्त पुनरागमन करत चौथे स्थान गाठले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिचा एकही निशाणा १० गुणांच्या खाली लागला नाही. सहाव्या फेरीनंतर ती अव्वल स्थानी आली. त्यानंतर तिने सलग १०.६ व १०.८ गुणांना निशाणा साधला.

अंतिम फेरीत २६ वर्षीय अपूर्वी सर्वात युवा होती. विश्कचषक स्पर्धेत तिने पहिल्यांदाच सुवर्ण जिंकले. याआधी तिला २०१५ मध्ये चँगवॉन येथे कांस्य, तर म्युनिच येथे रौप्य पटकावले होते. चिनच्या रौशू झाओ व हाँग झू यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अपूर्वी व अंजूम मुदगील यांनी २०२० च्या टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेची पात्रता आधीच निश्चित केली आहे. त्यामुळे चीनी खेळाडूंना आॅलिम्पिकचे तिकिट मिळाले. (वृत्तसंस्था)स्पर्धा आव्हानात्मक होती, पण मी हार मानली नव्हती. निकाल माझ्या बाजूने आल्याचा आनंद आहे. तरी आॅलिम्पिकपूर्वी बºयाच सुधारणा कराव्या लागतील. अनेक स्पर्धा खेळायच्या असल्याने कामगिरी सुधरावी लागेल. - अपूर्वी चंदेला