शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

अनुराग ठाकूर नवे सचिव

By admin | Updated: March 3, 2015 00:56 IST

वरिष्ठ क्रिकेट प्रशासक जगमोहन दालमिया यांची बीसीसीआयच्या सोमवारी झालेल्या आमसभेत अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

बीसीसीआय निवडणूक : अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा दालमियांकडे; संजय पटेल पराभूतचेन्नई : वरिष्ठ क्रिकेट प्रशासक जगमोहन दालमिया यांची बीसीसीआयच्या सोमवारी झालेल्या आमसभेत अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अनुराग ठाकूर यांची सचिवपदी निवड झाल्यामुळे एन. श्रीनिवासन गटाला मोठा धक्का बसला आहे. सचिवपदाच्या निवडणुकीत ठाकूर यांनी संजय पटेल यांचा पराभव केला. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे प्रमुख ठाकूर यांच्या अनपेक्षित विजयाचा अपवाद वगळता सोमवारी झालेल्या बीसीसीआयच्या निवडणुकीमध्ये उर्वरित सर्व पदांवर श्रीनिवासन गटाने वर्चस्व गाजवले. श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे निवडणूक लढविता आली नाही. झारखंड क्रिकेट संघटनेचे सचिव अमिताभ चौधरी यांची संयुक्त सचिवपदी निवड झाली. त्यांनी गोवा क्रिकेट संघटनेचे चेतन देसाई यांचा पराभव केला. हरियाणाचे अनिरुद्ध चौधरी यांनी राजीव शुक्ला यांचा पराभव करून कोषाध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. उपाध्यक्षपदाची तीन स्थाने बिनविरोध झाली, तर उर्वरित दोन पदांसाठी निवडणूक झाली. श्रीनिवासन गटाचे टी. सी. मॅथ्यूज (केरळ) व सी. के. खन्ना (दिल्ली) यांनी उपाध्यक्षपदाच्या दोन स्थानांवर बाजी मारली. खन्ना यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा, तर मॅथ्यूज यांनी रवी सावंत यांचा पराभव केला. उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांमध्ये आंध्रचे गोकाराजू गंगाराजू (दक्षिण), आसामचे गौतम राय (पूर्व) आणि जम्मू-काश्मीरचे एम. एल. नेहरू (उत्तर) यांचा समावेश आहे. पूर्व विभागातून पवार यांना सूचक न मिळाल्यामुळे दालमिया यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. सचिवपदासाठी भाजपाचे नेते ठाकूर यांनी केवळ एका मताने श्रीनिवासन यांच्या विश्वासातील पटेल यांचा पराभव केला. निवडणुकीमध्ये क्रॉस मतदान झाले नसते, तर अशी स्थिती निर्माण झाली नसती. श्रीनिवासन यांच्या प्रतिस्पर्धी गटातील उर्वरित उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागल्यामुळे केवळ ठाकूर यांच्यासाठी क्रॉस व्होटिंग झाल्याचे स्पष्ट झाले. बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ७४ वर्षीय दालमिया यांना श्रीनिवासन गटातील सदस्यांनी सर्वसंमतीने पसंती दर्शविली. या वेळी अध्यक्षपदासाठी नामांकन करण्याची संधी पूर्व विभागाला होती. पूर्व विभागातून पवार यांना सूचक मिळाला नाही. आयसीसीचे माजी अध्यक्ष पवार २००१ ते २००४ या कालावधीत बीसीसीआयचे अध्यक्ष होते. पूर्व विभागातील सर्व सहा संघटनांच्या प्रतिनिधींनी रविवारी झालेल्या बैठकीमध्ये श्रीनिवासन गटासोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. पवार यांनी मध्य विभागाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दालमिया अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले होते. न्यायालयाने श्रीनिवासन यांना निवडणूक लढण्यास मनाई केली होती. त्यांना केवळ मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिला होती. कायद्याच्या लढाईमुळे एजीएम अनेकदा स्थगित करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)श्रीनिवासन यांनी न्यायालयाचा अवमान केला च्एन. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या वार्षिक आमसभेत सहभागी होताना न्यायालयाचा अवमान केला, असा आरोप निलंबित राजस्थान क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष महमूद अब्दी यांनी केला आहे.च्बीसीसीआयमध्ये आरसीएचे स्थायी प्रतिनिधी असलेले अब्दी यांनी दावा केला, की‘सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना एजीएमपासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते; पण ते बैठकीमध्ये सहभागी झाले. च्श्रीनिवासन यांनी सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०१५ रोजी दिलेल्या निर्णयाचा अवमान केला. त्यात न्यायालयाने २ मार्च रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या एजीएममध्ये सहभागी न होण्याचे निर्देश दिले होते. त्यांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. निवडणूक केवळ पदाधिकारी व बीसीसीआयच्या उपाध्यक्ष पदांसाठी होती. नामांकन अर्जही याच पदांसाठी होते.’ च्प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अब्दी म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करताना श्रीनिवासन कार्यसमिती, स्थायी समिती, उपसमिती, आयपीएल संचालन परिषद आणि एसीसीमध्ये आपली नियुक्ती कायम ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील. ही बाब एजीएममध्ये सहभागी झाल्याप्रमाणेच आहे.’’च्दालमिया यांनी ९०च्या दशकात बोर्डाच्या सचिवपदाची सूत्रे स्वीकारली त्या वेळी बीसीसीआयचे खाते ८१.६० लाख रुपये कर्जात होते. त्याच वर्षी बोर्डाला लाभ झाला आणि त्यानंतर बीसीसीआय जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट संघटना झाली. दालमिया यांच्या कार्यकाळात विश्वकप स्पर्धेदरम्यान २ कोटी ६० लाख पौंडांचा लाभ झाला. त्याची बीबीसीआयने दखल घेतली होती. मार्च १९९७मध्ये दालमिया आयसीसीचे अध्यक्ष झाले.बीसीसीआयच्या हितासाठी आम्ही सर्व एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत. क्रिकेटवर लोकांचे प्रेम व विश्वास कायम राहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत.- अनुराग ठाकूरश्रीनिवासन यांची कृती सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०१५ रोजी दिलेल्या निर्णयाचा अवमान करणारी आहे. श्रीनिवासन यांच्यासह संजय पटेल यांनीही न्यायालयाचा अवमान केला आहे.सेकंड इनिंग...कोलकता : जगमोहन दालमिया यांना एक दशकापूर्वी संघटनेच्या राजकारणातून बाहेर करणाऱ्या जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयने पुन्हा एकदा त्यांना अध्यक्षपदाची खुर्ची बहाल केली. दालमिया यांना २००६ मध्ये अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते,पण ७४ वर्षीय या क्रीडा प्रशासकाची सोमवारी झालेल्या बीसीसीआयच्या बहुप्रतीक्षित वार्षिक आमसभेमध्ये पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली. त्याआधी, पूर्वविभागातून सूचक न मिळाल्यामुळे शरद पवार हे अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर झाले. ३० मार्च १९४०मध्ये मारवाडी कुटुंबात जन्मलेले दालमिया यांचे शिक्षण स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झाले. सलामीवीर व यष्टिरक्षक असलेले दालमिया जोराबागान क्लब (१९५७-६०), राजस्थान क्लब (१९६०-६२) आणि नॅशनल अ‍ॅथलेटिक्स क्लब (१९६३ -७८) आदी क्रीडासंस्थांशी जुळलेले होते. १९६३ मध्ये त्यांनी क्रिकेट प्रशासनामध्ये पदार्पण केले आणि राजस्थान क्लबचे सचिव झाले. बंगाल क्रिकेट संघटनेसोबतचा त्यांचा कार्यकाळ १९७८ पासून प्रारंभ झाला. तत्कालीन सचिव बिश्वनाथ दत्त यांनी त्यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर ते कॅबचे संयुक्त सचिव झाले आणि १९९३मध्ये त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. १९९३ नंतर ते सलग अध्यक्षपदी होते. दरम्यान, त्यांना १९ महिन्यांनंतर निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयने डिसेंबर २००६मध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. १९८७चे भारत व पाकिस्तानला विश्वकप यजमानपद मिळवून देणाऱ्या दालमियांकडे स्पर्धा आयोजन समितीचे सचिवपद सोपविण्यात आले. इंग्लंडच्या बाहेर प्रथमच विश्वकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.