शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कुंबळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार

By admin | Updated: June 20, 2017 20:41 IST

भारताचा महान क्रिकेटपटू अनिल कुंबळे याने अखेर भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.

 ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 20 - भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात रंगलेल्या शीतयुद्धानंतर अखेर आज अनिल कुंबळेने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्यावर्षी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणाऱ्या अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची कामगिरी दमदार झाली होती. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, अनिल कुंबळेने स्वत:सह खेळाडूंच्या मानधनात मोेठी वाढ करण्याची मागणी केल्याने त्याचे आणि बीसीसीआयचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता. अखेर आज कुंबळेने राजीनामा देत भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला. आज भारतीय क्रिकेट संघ लंडनहून वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाला. मात्र आयसीसीच्या समितीच्या बैठकीचे निमित्त करून कुंबळेने भारतीय संघासोबत जाणे टाळले होते. त्यामुळे आज दुपारपासूनच अनिल कुंबळे संघाचे प्रशिक्षकपद सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कुंबळेशी असलेला मुख्य प्रशिक्षकपदाचा करार संपल्यानंतर मुदतवाढ घेण्यास कुंबळेने नकार दिला होता. त्यानंतर त्याने बीसीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे राजीनामा पाठवला.  

कुंबळेची प्रशिक्षकपदाची मुदत यापूर्वीच संपल्याने तसेच अद्याप नव्या मुख्य प्रशिक्षकाची निवड न झाल्याने बीसीसीआयच्या सल्लागार समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळण्याची विनंती कुंबळेला केली होती. मात्र कुंबळेने आजच प्रशिक्षकपद सोडल्याने वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघासोबत जाण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.  

  कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील संबंध अधिकच बिघडले होते. विराटने कोणत्याही परिस्थितीत कुंबळेसोबत जुळवून घेणार नसल्याचे क्रिकेट सल्लागार समितीसोबत झालेल्या बैठकीत म्हटले होते. आता कुंबळेने पद सोडल्यानंतर भारताचा नवा प्रशिक्षक कोण होईल, याची उत्सुकला क्रिकेटप्रेमींना लागली आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी वीरेंद्र सेहवागसह अनेक माजी क्रिकेटपटू शर्यतीत आहेत.