शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कुंबळे करणार कोच पदासाठी नव्याने अर्ज

By admin | Updated: June 7, 2017 00:41 IST

भारतीय संघाचे सर्वांत अनुभवी आणि यशस्वी कोच ठरलेले अनिल कुंबळे या पदाच्या शर्यतीत कायम आहेत.

लंडन : भारतीय संघाचे सर्वांत अनुभवी आणि यशस्वी कोच ठरलेले अनिल कुंबळे या पदाच्या शर्यतीत कायम आहेत. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी आटोपण्यापूर्वी नव्याने निवड पॅनेलपुढे अर्ज पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:च्या ‘बायोडाटा’सह ते भारतीय संघाच्या भविष्याचा ‘रोडमॅप’ देखील सादर करणार आहेत. बीसीसीआयने कुंबळे यांना कोचपदासाठी नव्याने अर्ज करण्याची गरज असून ते थेट मुलाखतीला उपस्थित राहू शकतील, असे म्हटले होते. तथापि, कुंबळे यांनी या पदासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. कोचपदासाठी ज्यांचे अर्ज आले आहेत त्यात वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत, डोडा गणेश यांचा समावेश आहे. या सर्वांच्या मुलाखती तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीमार्फत होतील. समितीत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.आॅसट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज क्रेग मॅकडरमॉट यांनी देखील कोच पदासाठी अर्ज पाठविला पण त्यांचा अर्ज ३१ मे या डेडलाईनंतर आला आहे. सल्लागार समिती अर्जावर विचार केल्यानंतर मॅकडरमॉट यांना मुलाखतीसाठी बोलवायचे की नाही याबद्दल निर्णय घेईल. तीन सदस्यांची समिती पुढील मंगळवारी किंवा बुधवारी मुलाखत प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. १८ जून रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी संपणार असून भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना व्हायचे असल्याने कोचपदाचा उमेदवार आधी निश्चित व्हावा, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. आयपीएल फायनलच्यावेळी बीसीसीआय तसेच सीओएने देखील कुंबळे यांना नव्याने अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार कोहली आणि कोच कुंबळे यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त मीडियात गाजले.मागच्यावर्षी कुंबळे कोचसाठी पात्रता पूर्ण करीत नसताना देखील त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांचाच वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने मिळविलेले यश सर्वांपुढे आहे. नुकताच कोहली- कुंबळे वाद पुढे आला तेव्हा सचिन आणि गांगुली यांनी कोहलीशी चर्चा केली पण कुंबळे यांना मुलाखतीपर्यंत काहीच विचारणा करायची नाही, असे सल्लागार समितीने ठरविले असल्याचे कळते. जो कुणी नवा कोच बनेल त्या व्यक्तीकडे २०१९ च्या विश्वचषकापर्यंत दोन वर्षे पदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते.कुंबळे यांचा वर्षभराचा करार चॅम्पियन्स ट्रॉफी आटोपताच संपुष्टात येईल. त्यांच्यासोबत समन्वय साधण्यात त्रास होत असल्याची कोहलीसमवेत काही खेळाडूंची तक्रार होती. त्यामुळे त्यांना मुदतवाढ न देता नव्याने अर्ज मागविण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला होता. कुंबळे यांनी मात्र २५ मे रोजी स्वत:चा अर्ज बीसीसीआय पॅनेलकडे पाठवून दिला.