शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

अ‍ॅण्डी मरेची विजयी घोडदौड!

By admin | Updated: September 3, 2016 00:47 IST

जोरदार आवाजांमुळे होत असलेल्या अडचणींनंतरही जागतिक क्रमवारीतील द्वितीय क्रमांकाचा खेळाडू ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे याने तिसऱ्या फेरीत धडक मारली.

न्यूयॉर्क : जोरदार आवाजांमुळे होत असलेल्या अडचणींनंतरही जागतिक क्रमवारीतील द्वितीय क्रमांकाचा खेळाडू ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे याने तिसऱ्या फेरीत धडक मारली. त्याचवेळी महिला गटात बलाढ्य आणि संभाव्य विजेत्या अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने सहज विजय मिळवताना आगेकूच केली.आर्थर एश स्टेडियमच्या अत्याधुनिक सरकत्या छताखाली खेळताना सलग दोन आॅलिम्पिक पदक पटकावण्याचा पराक्रम केलेल्या मरेने दिमाखात आगेकूच करताना स्पेनच्या मार्सेल ग्रैनोलर्सचा ६-४, ६-१, ६-४ असस धुव्वा उडवला. तर, महिला एकेरीतील अव्वल खेळाडू सेरेनाने घरच्या मैदानावर अपेक्षित कामगिरी करताना आपल्याच देशाच्या वानिया किंगला ६-३, ६-३ असे लोळवले. विम्बल्डन चॅम्पियन मरेने जागतिक क्रमवारीत ४५व्या स्थानी असलेल्या मार्सेलविरुद्ध चांगला सराव करुन घेताना अनेकदा लांबलचक रॅलीज् खेळल्या. त्याचवेळी या सरकत्या छताच्या स्टेडियममध्ये खेळताना मरेला प्रेक्षकांच्या जोरदार आवाजाचाही सामना करावा लागला. २०१२ साली या स्पर्धेत बाजी मारलेला मरे चौथे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. पुढील फेरीत त्याच्यासमोर बिगरमानांकीत पाओलो लोरेंजीचे आव्हान असेल. दरम्यान, यावेळी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यानंतर स्टेडियमचे छत बंद करण्यात आले. मात्र यावेळी, प्रेक्षकांचा आवाज आणि त्यात छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा आवाज यामुळे टेनिसपटूंना त्रास झाला. यावेळी त्यांना चेंडूच्या टप्प्याचाही आवाज ऐकण्यास येत नव्हता. मात्र, संयमी खेळ करताना मरेने बाजी मारली. (वृत्तसंस्था)विलियम्स भगिनींचा धडाका!सेरेनाने पहिल्यांदाच सरकत्या बंदिस्त छताखाली खेळताना आपल्याच देशाच्या वानियाचा केवळ ६५ मिनिटांमध्ये फडशा पाडला. यासह सेरेनाने यूएस ओपन स्पर्धेत आपला ८६वा विजय नोंदवला. दरम्यान, सेरेनाने देखील या बंदीस्त स्टेडियममध्ये खेळताना अतिरीक्त आवाजामुळे खेळताना त्रास झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अन्य सामन्यात सेरेनाचे मोठी बहीण व्हीनसनेही आपली विजयी कूच कायम ठेवताना जर्मनीच्या जुलिया जॉर्जिसला ६-२, ६-३ असे लोळवले. लुसी साफारोवला मात्र पाचव्या मानांकीत रोमानियाच्या सिमोना हालेपविरुध्द ३-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. पोलंडच्या चौथ्या मानांकीत एग्निजस्का रदवांस्काने ब्रिटनच्या नाओमी ब्राडीला ७-६, ६-३ असे नमवून विजयी कूच केली.पोत्राचा अनपेक्षित, तर निशिकोरीचा झुंजार विजयअर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोने अनपेक्षित निकालाची नोंद करताना अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सन याचे आव्हान ७-६, ६-३, ६-२ असे संपुष्टात आणले. तर, जपानच्या केई निशिकोरीला आगेकूच करण्यासाठी चांगलेच झुंजावे लागले. चार सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात त्याने रशियाच्या कारेन काचानोव्हचा ६-४, ४-६, ६-४, ६-३ असा पाडाव केला.