शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

अ‍ॅण्डी मरेची कार्लोव्हिचवर मात

By admin | Updated: May 28, 2016 03:57 IST

ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेने शुक्रवारी क्रोएशियाचा उंच चणीचा खेळाडू इव्हो कार्लोव्हिचचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले, तर महिला विभागात

पॅरिस : ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेने शुक्रवारी क्रोएशियाचा उंच चणीचा खेळाडू इव्हो कार्लोव्हिचचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले, तर महिला विभागात दोनवेळा विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या पेत्रा क्वितोव्हाला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. तीनदा उपांत्य फेरी गाठणाऱ्या मरेला गेल्या तीन दिवासांमध्ये दोनदा निर्णायक सेटपर्यंत झुंज द्यावी लागली; पण शुक्रवारी मात्र या २९ वर्षीय खेळाडूने दोन तासांमध्ये कार्लोव्हिचचा ६-१, ६-४, ७-६ ने पराभव केला. क्रोएशियन खेळाडूविरुद्ध मरेने सातव्या सामन्यातही विजयाची मालिका कायम राखली. मरेला आता अमेरिकेच्या जॉन इस्नर व रशियाचा तेमुराज गाबाशविली यांच्यातील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. आठव्या मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिचने दुखापतीतून सावरताना स्लोव्हियाच्या ओंद्रेज मार्टिनचा पराभव करीत दुसऱ्यांदा अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले. राओनिचने तिसऱ्या सेटच्या सुरुवातीला वैद्यकीय मदत घेतली होती. त्याने या लढतीत ७-६, ६-२, ६-३ ने सरशी साधली. जानेवारी महिन्यात आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारल्यानंतरही त्याला अशा प्रकारच्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. २०१४ मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या राओनिचला आता क्रमवारीत ५५ व्या स्थानावर असलेल्या एलबर्ट रामोस-विनोलासच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. विनोलासने २३ व्या मानांकित अमेरिकेच्या जॅक सोकचा ६-७, ६-४, ६-४, ४-६, ६-४ ने पराभव केला. महिला विभागात चौथे मानांकन प्राप्त व गेल्या वर्षी विम्बल्डनमध्ये उपविजेती ठरलेल्या स्पेनच्या गार्बिने मुगुरुजाने अंतिम ९ गेम जिंकत बेल्जियमच्या यानिना विकमेरयरचा ६-३, ६-० ने पराभव केला. (वृत्तसंस्था)१० वे मानांकन प्राप्त चेक प्रजासत्ताकची क्वितोव्हा तिसऱ्या फेरीपर्यंत गाशा गुंडाळणारी अव्वल १० मध्ये मानांकन असलेली चौथी खेळाडू ठरली आहे. क्वितोव्हाला अमेरिकेच्या शेल्बी रोजर्सविरुद्ध ०-६, ७-६, ०-६ ने पराभव स्वीकारावा लागला. क्वितोव्हाने या लढतीत ३६ टाळण्याजोग्या चुका केल्या, तर क्रमवारीत १०८ व्या स्थानावर असलेल्या २३ वर्षीय खेळाडू रोजर्सने प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत अंतिम १६ मध्ये स्थान मिळवले. रोजर्सला यानंतर २५ व्या मानांकित रोमानियाच्या इरिना कॅमेलिया बेगुच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. भारताचा लिएंडर पेस व रोहन बोपन्ना यांनी शुक्रवारी आपापल्या सहकाऱ्यांसह फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. बोपन्ना व फ्लोरिन मर्जिया या सहाव्या मानांकित जोडीने दुसऱ्या फेरीत ग्रेगोयर बेरेर व क्विंटन हेरिस या फ्रान्सच्या जोडीचा ६-३, ६-४ ने पराभव केला. पेस व पोलंडचा त्याचा सहकारी मार्सिन माटकोवस्की यांनी दुसऱ्या फेरीच्या लढतीत आॅस्ट्रियाचा ज्युलियन नोल्स व जर्मनीचा फ्लोरिन मेयर या जोडीचा ६-४, ६-३ ने पराभव केला.