शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अमित पांघल, पूजा राणी यांचा ‘गोल्डन पंच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 03:13 IST

स्टार बॉक्सर अमित पांघल याने सुवर्णमय घोडदौड सुरू ठेवृून ५२ किलो प्रकारात यंदा दुसरे सुवर्ण जिंकले.

बँकॉक : स्टार बॉक्सर अमित पांघल याने सुवर्णमय घोडदौड सुरू ठेवृून ५२ किलो प्रकारात यंदा दुसरे सुवर्ण जिंकले. ८१ किलो गटात पूजा राणी हिने देखील सुवर्ण पदाकाची कमाई करताच शुक्रवारी संपलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत शनदार कामगिरीसह भारताने १३ पदकांची कमाई केली. त्यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्यचा समावेश आहे. महिला आणि पुरुषांची स्पर्धा एकाचवेळी आयोजित होण्याची ही पहिली वेळ ठरली.मागच्या वर्षी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या पांघलने कोरियाचा किम इंक्यूवर मात केली. अमितने बल्गेरियातील स्ट्रांजा मेमोरियल स्पर्धेतही सुवर्ण जिंकले होते. यंदा ४९ वरुन ५२ किलो गटात आल्यापासून अमितची ही पहिलीच स्पर्धा होती. २०१५ मध्ये अमितने कांस्य जिंकले होते.पूजाने चीनची वांग लिना हिचा पराभव करीत सुवर्ण पदकावर नाव कोरले. वडिलांचा विरोध पत्करुन मुष्टियुद्धात करिअर सुरू करणाºया पूजाने ६ महिन्यातच कुटुंबीयांची समजूत घातली. २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने कांस्य जिंकले होते.राष्टÑीय चॅम्पियन दीपकसिंग (४९ किलो), आशिष कुमार(७५) व कविंदरसिंग (५६) यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. याआधी भारतीय पुरुषांची सर्वोत्कृष्ट कामगिरी २००९ मध्ये झाली होती. त्यावेळी दोन सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य पदके जिंकण्यात यश आले होते.पांघलने आक्रमक सुरूवात केली. प्रतिस्पर्धी खेळाडूकडे अमितच्या ठोशांचे उत्तर नव्हते. ४९ किलो अंतिम लढतीत दीपकला उझबेकिस्तानचा नोदिरजोन मिझारमेदोवने गुणविभागणीच्या बळावर नमवले. भारताने रेफ्रीच्या निर्णयावर ‘येलोकार्ड’ दाखवून अपील केले होते. त्यानुसार रेफ्रीने स्लो मोशन फुटेज पाहून निर्णय दिला. हा निर्णय भारताच्या विरोधात गेला.

टॅग्स :boxingबॉक्सिंग