शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

अमेय जोशीची दमदार आगेकूच

By admin | Updated: June 29, 2016 19:55 IST

मुंबईकर अमेय जोशीने ठाण्याच्या सिद्धेश हुडेकरचा सरळ दोन गेममध्ये पराभव करत पहिल्या महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेत आगेकूच केली

महाराष्ट्र बॅडमिंटन : मुंबईकर विकीची देखील चमकमुंबई : मुंबईकर अमेय जोशीने ठाण्याच्या सिद्धेश हुडेकरचा सरळ दोन गेममध्ये पराभव करत पहिल्या महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेत आगेकूच केली. दुसऱ्या बाजूला मुंबईच्याच विकी लापसियाने रत्नागिरीच्या सुधांशू चर्तुवेदीला ३-१ असे नमवले.महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने स्पोटर््स युनायटेडच्या वतीने चेंबुर जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अमेयने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना सिध्देशला दबावाखाली ठेवले. पहिल्या गेममध्ये सिद्धेशने काहीअंशी प्रतिकार केला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये अमेयच्या धडाक्यापुढे सिद्धेशचा निभाव लागला नाही. एकहाती वर्चस राखताना अमेयने १५-११, १५-०९ अशी सहज बाजी मारली.दुसऱ्या बाजूला अटीतटीच्या झालेल्या लढतीत विकीने रत्नागिरीच्या सुधांशूचा २-१ असा पाडाव केला केला. पहिल्या गेममध्ये (१५-१३) २ गुणांच्या फरकाने बाजी मारत विकीने आघाडी घेतली. यानंतर सुधांशूने जबरदसत पुनरागमन करताना दुसऱ्या गेमसह सामना बरोबरीत आणला. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये पुन्हा एकदा चुरशीचा खेळ झाला. मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना विकीने १५-१३, १४-१५, १५-१४ असा रोमहर्षक विजय मिळवला. अन्य सामन्यात मुंबईच्या संकेत शिरभाटेने नाशिकच्या सौरभ अल्पेवर १५-११, १५-१३ असा विजय मिळवला.नागपूरच्या वरद गजभीये यानेही विजयी कूच करताना अमरावतीच्या आशिष चौहानचे कडवे आव्हान १५-५, १०-१५, १५-१२ असे परतावले. तसेच पुण्याच्या अमेय ओकने दणदणीत विजय मिळवताना अमरावतीच्याच निखिल पांडेला १५-७, १५-९ असा धक्का दिला. तर ठाण्याच्या प्रसन्नजित शिरोडकरने मुंबईच्या विराज दुवेदीचा १५-०५, १५-११ असा धुव्वा उडवला. (क्रीडा प्रतिनिधी).................................इतर निकाल : अमेय जोशी (मुंबई) वि.वि. सिध्देश हुडेकर (ठाणे) १५-११, १५-९; विनीत कांबळे (पुणे) वि.वि. कुणाल दसरवार (नागपूर) १५-५, १५-९; सुदर्शन सौरोट (पुणे) वि.वि. दिपेश पाटील (जळगाव) १५-६, १५-१४; संकेत शिरभाटे (मुंबई) वि.वि. सौरभ अल्पे (नाशिक) १५-११, १५-१३.....................................