शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

अमेरिकन ओपन बॅडमिंटन : सहा भारतीय दुसऱ्या फेरीत

By admin | Updated: July 6, 2016 18:11 IST

कॅनडा ओपन स्पर्धेत विजेतेपद जिंकणारा बी. साई प्रणीतसह एच. एस. प्रणय, आरएमव्ही गुरुसाईदत्त, प्रतुल जोशी, आनंद पवार यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अमेरिकन

ऑनलाइन लोकमतएल मोंटे, दि. ६ : कॅनडा ओपन स्पर्धेत विजेतेपद जिंकणारा बी. साई प्रणीतसह एच. एस. प्रणय, आरएमव्ही गुरुसाईदत्त, प्रतुल जोशी, आनंद पवार यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बी. साई प्रणीतने स्वीडनच्या हेनरी हुर्स्केनेनला सरळ दोन गेममध्ये २१-१३, २१-१२ गुणांनी पराभूत केले. प्रणीतचा पुढील सामना कॅनडाच्या बी. आर. संकिर्थविरुद्ध होईल. दुसरीकडे एच. एस. प्रणयने मेरिकेच्या केल्विन लीनचा २१-७, २१-६ गुणांनी फडशा पाडत दुसऱ्या फेरीतील आपली जागा निश्चित केली. प्रणयला पुढच्या फेरीत आयर्लंडच्या जोशूआ मॅगीचे आव्हान असेल. भारताचा आएमव्ही गुरुसाईदत्तने स्थानिक खेळाडू फिलीप जापला २१-८, २१-१३ गुणांनी नमविले.

गुरुसाईदत्तचा पुढील सामना जपानच्या काजुमासा सकाइविरुद्ध होणार आहे. युवा खेळाडू प्रतुल जोशीने कॅनडाच्या केव्हिन बार्कमॅनला २१-१३, २१-१३ असे पराभूत केले. आनंद पवारने डेन्मार्कच्या पिडर एस ला २१-१७, २१-७ असा धुव्वा उडवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. आनंदचा पुढील सामना आॅस्ट्रियाच्या डेव्हिड ओबेरनोस्टररविरुद्ध होईल. भारताच्या हर्षिल दाणीला मात्र इस्त्राईलच्या मिशा जिल्बरमॅनकडून १८-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला