शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन बॅडमिंटन : अजय जयराम व आनंद पवार उपांत्यपुर्व फेरीत भिडणार

By admin | Updated: July 8, 2016 17:39 IST

चौथ्या मानांकीत अजय जयराम आणि बिगरमानांकीत आनंद पवार यांनी चमकदार कामगिरी करताना अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.

अमेरिकन बॅडमिंटन : एचएस प्रणय, बी. साई प्रणीत, तन्वी लाड स्पर्धेबाहेरकॅलिफोर्निया : चौथ्या मानांकीत अजय जयराम आणि बिगरमानांकीत आनंद पवार यांनी चमकदार कामगिरी करताना अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे उपांत्यपुर्व फेरीमध्ये हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर लढणार असल्याने या लढतीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कसलेल्या जयरामने आपल्या लौकिकासह आक्रमक खेळ करताना पोर्तुगालच्या पेड्रो मार्टिसचे आव्हान सरळ गेममध्ये परतावले. केवळ ३१ मिनिटांमध्ये विजय मिळवताना जयरामने २१-११, २१-१५ अशी सहज बाजी मारली. त्याचवेळी दुसरीकडे आनंदने आपलाच देशबांधव प्रतुल जोशीचे आव्हान ३५ मिनिटांमध्ये २१-१०, २१-१३ असे संपुष्टात आणले. एकीकडे या दोन्ही खेळाडूंनी विजयी कूच केली असताना दुसरीकडे मात्र भारताच्या अन्य खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. पाचवा मानांकीत एचएस प्रणय, सहावा मानांकीत बी. साई प्रणीत आणि महिलांमध्ये तन्वी लाड यांना स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. कोरियाच्या ली ह्यून याने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना प्रणयला २५-२३, २३-२१ असे नमवले. त्याचवेळी तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत प्रणीतला जपानच्या काजूमासा सकईविरुध्द २१-१३, १७-२१, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत तन्वीचा अमेरिकेच्या बेईवेन झांगविरुद्ध १७-२१, १५-२१ असा पराभव झाला.दुसऱ्या बाजूला पुरुष दुहेरीमध्ये भारताची अव्वल जोडी मनु अत्री - बी. सुमीत रेड्डी यांनी अपेक्षित आगेकूच करताना जपानच्या केन्या मित्सुहाशी - यूता वातानबी यांना २३-२१, २१-१३ असे नमवले. यासह भारतीय जोडीने उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. तर महिला दुहेरीत जकामपुडी मेघना - एस. पुर्वीशा यांनी शानदार विजय मिळवताना अमेरिकेच्या एरियल ली - सिडनी ली यांना २१-१६, २१-६ असे लोळवून उपांत्यपुर्व फेरी गाठली.