शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक शोषणाचा आरोप

By admin | Updated: February 4, 2016 03:45 IST

भारतीय हॉकी संघाला रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळवून देणारा राष्ट्रीय संघाचा कर्णधार सरदारसिंगवर त्याच्या ब्रिटिश वाग्दत्त वधूने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे

चंदीगड : भारतीय हॉकी संघाला रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळवून देणारा राष्ट्रीय संघाचा कर्णधार सरदारसिंगवर त्याच्या ब्रिटिश वाग्दत्त वधूने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. लुधियाना पोलिसांकडे याबाबत लिखित तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस विभागातर्फे सरदारविरुद्ध अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.२०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या सरदारने आपल्या नेतृत्वाखाली इंचियोन आशियाई स्पर्धेत राष्ट्रीय संघाला सुवर्णपदक मिळवून देताना रिओ आॅलिम्पिकचे तिकीट पक्के करून दिले होते. २९ वर्षीय मिडफिल्डर हरियाणा पोलीसमध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहे. राष्ट्रीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार आणि भारतीय पण मूळची ब्रिटिश महिला यांचा २०१२ मध्ये साखरपुडा झाल्याचे वृत्त झळकले होते. या दोघांंना त्यावेळी सोबत बघितले होते. इंग्लंडच्या अंडर-१९ हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या महिलेने मंगळवारी पोलिसांना दिलेल्या लिखित तक्रारीमध्ये सरदारवर लैंगिक छेडखानीचा आरोप केला आहे. सध्या आम्ही तक्रारीची चौकशी करीत असून सरदारवर एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असे लुधियाना पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे. पीडित महिला खेळाडूने सरदारसिंगवर विवाहास नकार देण्यासोबत मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या शोषण केले असल्याचे आरोप केले आहेत. महिलेने म्हटले आहे की, ‘गर्भपात करण्यास भाग पाडल्यापासून सरदार मला टाळत आहे. त्याने मानसिकदृष्ट्या माझे शोषण केले असून आता विवाहास नकार देत आहे. मी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून मला न्याय मिळेल, असा विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)जालंधर : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारसिंगविरुद्ध भारतीय पण मूळच्या ब्रिटिश महिलेद्वारे लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी लुधियाना पोलीस आयुक्तांनी बुधवारी एक विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करणार आहे. लुधियानाचे पोलीस आयुक्त परमराजसिंग उमरानंगल यांनी सांगितले की, ‘सरदार प्रकरणात चौकशीसाठी एक विशेष समिती गठित करण्यात आली आहे. या प्रकरणात ही समिती चौकशी करणार असून, आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस उपायुक्त सतबीरसिंग करणार असून, त्यात एक सहायक पोलीस आयुक्त आणि एसएचओचा समावेश आहे.’२१ वर्षीय महिलेने आश्चर्यचकित करणारा आरोप करताना सरदारसिंगची वाग्दत्त वधू असल्याचा दावा केला आहे. महिलेने म्हटले आहे की,‘माझी व सरदारसिंगची पहिली भेट २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकदरम्यान झाली होती. तेव्हापासून आमचे संबंध आहेत. सरदारने विवाहाचे आश्वासन देताना माझ्यासोबत शारीरिक संबंध स्थापित केले होते. २०१५ मध्ये त्याने सक्तीने मला गर्भपात करण्यास भाग पाडले. तेव्हापासून तो माझ्या संपर्कात नाही.’