शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

महिलांच्या सर्व क्रिकेट सामन्यांचे प्रसारण व्हायला पाहिजे : मिताली

By admin | Updated: March 7, 2016 03:21 IST

महिला संघांच्या सामन्यांचे नियमितपणे टीव्हीवर प्रसारण झाले तर महिला क्रिकेटपटू टेनिसस्टार सानिया मिर्झा व बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्याप्रमाणे लोकप्रिय होतील

नवी दिल्ली : महिला संघांच्या सामन्यांचे नियमितपणे टीव्हीवर प्रसारण झाले तर महिला क्रिकेटपटू टेनिसस्टार सानिया मिर्झा व बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्याप्रमाणे लोकप्रिय होतील, असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केले. भारतीय महिला संघांची अलीकडच्या कालावधीतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. भारतीय संघाने आॅस्ट्रेलियात जानेवारी महिन्यात टी-२० मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मायदेशात वन-डे व टी-२० सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला. महिला क्रिकेटपटूंना सानिया व सायना यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळू शकते का, याबाबत बोलताना मिताली म्हणाली, ‘‘जर आमच्या लढतींचे टीव्हीवर प्रसारण झाले तर तशी शक्यता नाकारता येत नाही. वैयक्तिक विचार करता महिला क्रिकेटपटूंना अनेक प्रायोजक लाभतील. केवळ काही सामन्यांचे प्रसारण झाले तर तुमच्या खेळाचे कुणी अनुकरण करणार नाही. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत प्रसारण झाले नाही. या मालिकेतही आमची कामगिरी उल्लेखनीय ठरली. परिस्थिती जर अशीच राहिली तर सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.’’विश्व टी-२० स्पर्धेच्यानिमित्ताने भारतात महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याची चांगली संधी आहे, असेही महिला संघाची कर्णधार मिताली म्हणाली.(वृत्तसंस्था)मितालीने सांगितले, ‘‘भारतीय संघ चांगल्या फॉर्मात असून सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघाकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. बीसीसीआयकडून महिला क्रिकेटपटूंना बिग बॅशसारख्या टी-२० स्पर्धेत खेळण्याची परवानगी मिळायला हवी.’’बिग बॅशसारख्या स्पर्धांमुळे सर्वोत्तम खेळाडूसोबत खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे बरेच काही शिकायला मिळेल. स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर व वेदा कृष्णमूर्ती यांच्यासारख्या युवा खेळाडूंना क्रिकेटर म्हणून परिपक्व होण्याची संधी मिळेल, असेही मिताली म्हणाली.आमच्यासाठी भारतात आयपीएलसारखी स्पर्धा नाही. त्यामुळे आॅस्ट्रेलिया व इंग्लंडला आम्ही त्यांच्या स्पर्धेत खेळावे असे वाटत असेल तर बीसीसीआयकडून आम्हाला समर्थन मिळेल, अशी आशा आहे. त्यामुळे पुढच्या विश्वकप टी-२० स्पर्धेत भारतीय संघ वेगळा भासेल, असा विश्वास मितालीने या वेळी व्यक्त केला.