शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात; देशभरातून पुरुषांचे २०, महिलांचे १० संघ

By रवी दामोदर | Updated: December 15, 2023 12:27 IST

देशभरातून पुरुषांचे २०, महिलांचे १० संघ सहभागी

रवी दामोदर, अकोला

अकोला : अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन हनुमान क्रीडा संकुल येथे गुरुवार, दि.१४ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी उद्घाटन सामना खेळविण्यात आला. या स्पर्धेत देशातील पुरुषांचे २० व महिलांचे १० संघ सहभागी झाले आहेत.हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने डॉ. राजकुमार बुले यांच्या सन्मानार्थ, स्व. रामकृष्ण अप्पा मिटकरी चषकाचे आयाेजन केळीवेळी येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक एकनाथ दुधे, तर पुरुष गटाच्या सामन्याचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर राठोड, तर महिला गटाच्या सामन्याचे उद्घाटन गोदावरी मिटकरी यांनी केले.

प्रमुख अतिथी म्हणून हभप सोपान शेलार, डॉ. श्रीकांत काळे, कविता मिटकरी, राष्ट्रीय कबड्डीपटू प्रवीणा गोणे, दहीहंडा ठाणेदार वाघमारे, नाजूकराव पखाले, प्रा. विवेक हिवरे, वासुदेव नेरकर, डॉ. अशोक मोंढे, रामभाऊ अहिर आदी उपस्थित होते. उद्घाटन सामना पुरुष गटात हनुमान क्रीडा मंडळ, केळीवेळी विरुद्ध समता क्रीडा मंडळ, नाशिक आणि महिला गटात अकोला जिल्हा संघ, अकोला विरुद्ध एसएस अकॅडमी, दिल्ली यांच्यात झाला. या कबड्डी स्पर्धा मॅटवर खेळविण्यात येत आहेत. 

या स्पर्धेकरिता आलेले पंच

स्पर्धा निरीक्षक वासुदेव नेरकर, आंतरराष्ट्रीय पंच पद्माकर देशमुख, पंच अधिकारी ऋषिकेश कोकाटे, राहुल यादव, प्रशांत रोडे, रवी रोहनकार, चरण शिरसाट, विजय सोनकर, हरीश हरणे, राम नवघरे, दिनेश चंदेल, बिपिन हटकर, वसंत उडाले, देवी कांबळी, महेंद्र डेंगे, रवी नारनवरे, नरेंद्र उमरेकर, शैलेश देशमुख, सय्यद मकसूद, विकास नवघरे, संजय खातोकार, रवी राठोड, सुरेश कालसर्पे, सुधाकर कोहालकर, गौरव धानोरकर, वानखडे, शुभम लुंगे, शोभा सहारे, हे काम पाहणार आहेत.

टॅग्स :Kabaddiकबड्डीAkolaअकोला