शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अक्रम

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

देशाचे प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब

देशाचे प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब
वसीम अक्रम यांचा कॉलम
माझ्या मते १०-१२ दिवसांपूर्वी पाकिस्तानी तंबूत काही समस्या निर्माण झाल्या असण्याची शक्यता आहे. काही सीनिअर खेळाडू व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ग्रँट लुडेन यांच्यादरम्यान वाद झाल्याचे वृत्त आले होते. पण, त्यानंतर या सर्व अडचणी सोडविण्यात यश आले. ही बाब आता समोर आल्यामुळे याची सांगड भारताविरुद्धच्या पराभवासोबत घालण्यात येत आहे, पण असे काहीच नाही, याची मी हमी देतो.
माझा एकेकाळचा सहकारी वकार संघाचा मुख्य प्रशिक्षक असून त्याच्याकडे जोखिमेचे काम आहे. संघाला पुन्हा विजयपथावर आणण्यासाठी त्याला काही योजना आखावी लागणार आहे, पण खेळाडूंनीही काही रणनीती तयार करणे आवश्यक आहे. तुम्ही प्रत्येक वेळी प्रशिक्षकावर विसंबून राहू शकत नाही कारण संघातील खेळाडू काही १५ वर्षांची मुले नाहीत.
संघातील खेळाडूंसाठी १०.३० च्या आता घरात, ही योजना माझ्या आकलनापल्याड आहे. आपण २१ व्या शतकात वावरत असताना खेळाडूंवर कर्फ्यू लावणे चुकीचे आहे. इम्रान खान कर्णधार असताना आम्हाला कधीच अशा समस्येला सामोरे जावे लागले नाही.
पाक संघाला आता वेस्ट इंडीजच्या अव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. विंडीजविरुद्ध आयर्लंड संघाने ३०० पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केलेला आहे. जेसन होल्डरला कुठल्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, याची मला चांगली कल्पना आहे. २४ व्या वर्षी कर्णधारपदाची जबाबदारी आणि सीनिअर खेळाडूंचे समर्थन नसणे, अशी परिस्थिती मी अनुभवली आहे. विंडीजचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा खेळाडू जगातील लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य देत आहेत. विंडीज निवड समितीने ड्वेन ब्राव्हो व किरोन पोलार्ड यांच्यासारख्या दोन दिग्गज खेळाडूंना बाहेरचा मार्ग दाखविला आहे. त्यामुळे संघाच्या निराशाजनक कामगिरीचा मार्ग निवड समितीनेच निश्चित केल्याचे दिसून येते.