मुंबई : फुटबॉल विश्वचषक २०१८ च्या पात्रता फेरीचे गत तीनही सामने गमावलेल्या भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने खेळाडूंना तुर्कमेनिस्तानविरुद्ध आठ आॅक्टोबरला होणाऱ्या सामन्याआधी सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली.छेत्री भारतीय संघाचा मुख्य खेळाडू आहे आणि या हंगामात इंडियन सुपर लीग (आयएसएल)मध्ये मुंबई इंडियनकडून खेळत आहे. तथापि, त्याच्याबरोबर आयएसएलमध्ये खेळणाऱ्या संघातील उर्वरित खेळाडू राष्ट्रीय संघासाठी आयसीएलच्या सुरुवातीच्या लढती सोडून तुर्कमेनिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्याआधीच्या शिबिरात सहभागी होणार आहेत.२0१८ च्या वर्ल्डकप क्वालिफायरच्या पहिल्या तिन्ही सामन्यात भारतीय संघाला पराभवाची चव चाखावी लागली होती. भारताने ओमान, गुआम आणि इराण या संघाविरुद्धचे सामने गमावले. तो म्हणाला, ‘‘आम्हाला तुर्कमेनिस्तानविरुद्ध सामन्याच्या सरावासाठी आणखी वेळेची आवश्यकता होती. पुढील वर्षी अशा प्रकारचे सामने लक्षात घेऊन वेळापत्रक तयार करायला हवे. ज्यामुळे आम्हाला सर्वच सामने खेळता येऊ शकतील.’’ छेत्रीने भारतासाठी खेळणे सर्वात महत्त्वाचे असल्याचा पुनरुच्चार केला. तो म्हणाला, माझे मुख्य लक्ष्य देशासाठी खेळणे हे आहे. त्यानंतर मी आयसीएलमध्ये पुन्हा येऊन खेळेल. छेत्रीने राष्ट्रीय संघाला मिळत असलेल्या सलग पराभवाविषयी म्हटले, ‘‘आम्ही ओमान आणि इराणविरुद्ध खूप चांगली कामगिरी केली; परंतु गुआमविरुद्ध आम्ही निराशाजनक कामगिरी केली. (वृत्तसंस्था)
अजय जडेजा यांचा राजीनामा
By admin | Updated: October 3, 2015 00:25 IST