शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्पर्धेत एआयटीएला खेळाडूंचा सहभाग अपेक्षित, खेळाडूंवर सक्ती न करण्याची महासंघाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:23 IST

नवी दिल्ली : राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा दर्जा उंचावण्यासाठी आतूर असलेल्या एआयटीएने देशातील अव्वल खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे, पण याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले जाणार नाही. कारण महासंघ या खेळाडूंना सूट देण्यास तयार आहे.एआयटीएने ३१ आॅगस्ट रोजी जाहीर केले होते, की खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य ...

नवी दिल्ली : राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा दर्जा उंचावण्यासाठी आतूर असलेल्या एआयटीएने देशातील अव्वल खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे, पण याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले जाणार नाही. कारण महासंघ या खेळाडूंना सूट देण्यास तयार आहे.एआयटीएने ३१ आॅगस्ट रोजी जाहीर केले होते, की खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारी अनुदान मिळवण्यास व भारतीय संघाची निवड करण्यास मदत होईल. पण, महासंघाने सवलत दिल्यामुळे खेळाडूंना सहभागी होण्यासाठी सक्ती करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले.क्रीडा मंत्रालयाने अखिल भारतीय टेनिस महासंघाला (एआयटीए) राष्ट्रीय स्पर्धेबाबत विचारणा केली. त्यावेळी या स्पर्धेत केवळ दुय्यम दर्जाचे खेळाडू सहभागी होत असल्याचे उघड झाले. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. मंत्रालयाने एआयटीएला थेट निर्देश दिले नसले तरी स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग झालेला बघण्यास आवडणार असल्याचे म्हटले आहे.एआयटीएने कबुली दिली, की जर अव्वल खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले तर महासंघाला सरकारकडून खेळाडूंसाठी आर्थिक सहकार्य मिळविणे सोपे होईल.एआयटीएचे महासचिव हिरण्मय चॅटर्जी म्हणाले, ‘राष्ट्रीय स्पर्धेत अनेक देशांमध्ये दुय्यम दर्जाचे खेळाडू सहभागी होतात. आपल्याला राष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा उंचवावा लागेल. त्यामुळे सर्व खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यास सांगण्यात येईल. त्यामुळे एआयटीएसाठी राष्ट्रीय चॅम्पियनला आर्थिक सहकार्य देण्याबाबत विनंती करणे सोपे जाईल.’राष्ट्रीय जेतेपद मिळविण्यासाठी प्रलोभन देण्यात येत असले तरी जोपर्यंत एआयटीए खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य करीत नाही तोपर्यंत युकी भांबरी, रामकुमार रामनाथन, रोहन बोपन्ना किंवा अंकित रैना या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. राष्ट्रीय चॅम्पियनला आतापर्यंत आयोजकांतर्फे पाच लाख आणि सरकारतर्फे पाच लाख रुपयांचे अनुदान मिळत होते. ही रक्कम ५० हजार डॉलरची एटीपी चॅलेंजर जिंकण्याच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यात विजेत्याला ७२०० डॉलर (जवळजवळ ४.५ लाख रुपये) मिळतात.हे सर्वस्वी खेळाडूंवर अवलंबून राहील. आघाडीचे खेळाडू यातून माघार घेऊ शकतात. राष्ट्रीय विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वाईल्ड कार्ड प्रवेश देता येईल. या प्रोत्साहनाचा लाभ घेण्यास इच्छुक आहे किंवा नाही, हे सर्वस्वी खेळाडूंवर अवलंबून राहील.- हिरण्मय चॅटर्जी,एआयटीएचे महासचिव

टॅग्स :Sportsक्रीडा