शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

विमान कंपनीच्या सावळ्या गोंधळाचा बॅडमिंटनपटूंना फटका

By admin | Updated: September 5, 2016 05:41 IST

एच एस प्रणयसह अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंना मलेशियन विमान कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

नवी दिल्ली : इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्री. गोल्डमध्ये सहभागी होण्यास चाललेल्या एच एस प्रणयसह अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंना मलेशियन विमान कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. यामुळे त्यांच्या सामन्यांवर परिणाम होणार नाही ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.प्रणय सोबत साईप्रणित, पीसी तुलसी सिरिल वर्मा आणि रुथविका शिवानी यांनी हैदराबादहून क्वालालम्पूर येथे जाण्यासाठी आज पहाटेच्या एमएच 0१९९ या विमानात तिकीट बुकिंग केले होते. परंतु हे विमान खूपच उशिरा उडाले, त्यामुळे या खेळाडूंच्या पुढील विमानप्रवासाचा बोजवारा उडाला. गा गोंधळामुळे या खेळाडूंची मलेशियातील जाकार्ताहून स्पर्धा होणाऱ्या बालीकपापन शहरात जाणारी कनेक्टिंग फ्लाईट चुकली.प्रणयने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मलेशिया एअरलाईन्सने आमच्या योजनेवर पाणी ओतले. आमची हैदराबाद-क्वालालम्पूर फ्लाईट उशिरा आली. त्यामुळे जाकार्ताला जाणारी पुढील कनेक्टिंग फ्लाईट चुकली. त्यांनी आमची दुसऱ्या विमानात सोय केली परंतु त्यालासुध्दा तीन तास उशिर झाला. आता आम्हाला रात्रीच्या विमानाचे दहा हजार रुपये भरुन तिकीट घ्यावे लागले. मलेशियन एअरलाईन्सकडून अद्याप कोणताही परतावा मिळालेला नाही. आता आम्ही जाकार्ता विमानतळावर वेटिंग करीत असून उद्या सकाळीच आम्ही बालीकपापनला पोहचू. (वृत्तसंस्था)>७ सप्टेंबरला सामने असल्याने बचावलो...ही स्पर्धा सहा सप्टेंबरला सुरु होणार असून भारतीय खेळाडूंचे सामने सात तारखेपासून सुरु होत आहेत. २0१४ साली इंडोनेशियन मास्टर्स स्पर्धा जिंकणारा प्रणय म्हणाला, आमचे सामने सात सप्टेंबरला होणार असल्यामुळे आम्ही बचावलो, जर ६ तारखेला असते तर आम्हाला सामना सोडावा लागला असता.