शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाचे शानदार विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2015 03:45 IST

अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात बलाढ्य एअर इंडियाने ११व्या गुरू तेग बहादूर गोल्ड कप आॅल इंडिया हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना तगड्या आर्मी ईलेव्हनला

मुंबई : अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात बलाढ्य एअर इंडियाने ११व्या गुरू तेग बहादूर गोल्ड कप आॅल इंडिया हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना तगड्या आर्मी ईलेव्हनला ३-१ असे नमवले. विशेष म्हणजे या विजेतेपदासह एअर इंडियाने ७ वर्षांनंतर या स्पर्धेत पुन्हा एकदा बाजी मारली. यापूर्वी २००८ साली एअर इंडियाने इंडियन आॅइलला नमवून विजेतेपद पटकावले होते.मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडच्या (एमएचएएल) वतीने चर्चगेट येथील हॉकी स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमण व बचाव याचा सुरेख ताळमेळ साधताना सामना रंगतदार केला. मुळात अ‍ॅड्रीयन डीसूझा (एअर इंडिया) आणि नजमुद्दीन (आर्मी ईलेव्हन) या दोन्ही गोलरक्षकांनी निर्णायक कामगिरी करताना प्रतिस्पर्धी आक्रमकांना गोल करण्यापासून रोखल्याने निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. यानंतर घेण्यात आलेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये एअर इंडियाच्या आक्रमकांनी बाजी मारली.पहिल्या सत्राच्या तुलनेत दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ झाला. या वेळी आर्मी ईलेव्हनच्या बिनय भेंगरा याने एअर इंडियाच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारताना गोल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्याकडून अनेक चुका झाल्या आणि त्या चुकांचा फायदा घेत एअर इंडियाच्या बचावपटूंनी त्याला गोल करण्यापासून रोखले. निर्धारित वेळेनंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये एअर इंडियाचा गोलरक्षक अ‍ॅड्रीयन डीसूझाने भक्कम बचावाचे प्रदर्शन करताना एअर इंडियाला विजयी केले. त्याने आर्मी ईलेव्हनच्या विश्वा ठाकूर, रजनीश सॅलेरिया आणि बिनय भेंगरा यांचे स्ट्रोक रोखताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आर्मीच्या केवळ बिराज एक्काला डीसूझाचा बचाव भेदण्यात यश आले. तर एअर इंडियाकडून ए. बी. चियान्ना, विकास पिल्ले आणि जोगा सिंग यांनी गोल करून संघाच्या विजेतेपदावर शिक्का मारला. (क्रीडा प्रतिनिधी)वैयक्तिक विजेते :सामनावीर : अ‍ॅड्रीयन डीसूझा (एअर इंडिया)सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : नजमुद्दीन (आर्मी ईलेव्हन)सर्वोत्कृष्ट संरक्षक : रीनेल सिंग (आर्मी ईलेव्हन)सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक : मोहम्मद निझाम (मध्य रेल्वे)सर्वोत्कृष्ट आक्रमक : युवराज वाल्मीकी (मध्य रेल्वे)