्रजोगळेकर करंडक क्रिकेट
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
अध्यक्ष एकादशला जोगळेकर करंडक
्रजोगळेकर करंडक क्रिकेट
अध्यक्ष एकादशला जोगळेकर करंडकनागपूर : बँकर्स स्पोर्टस् कौन्सिलद्वारा आयोजित व्ही. एम. जोगेळेकर स्मृती क्रिकेट सामन्यात अध्यक्ष एकादशने बाजी मारली. धनवटे नॅशनल कॉलेजच्या वसंतनगर मैदानावर खेळविण्यात आलेल्या टी-२० सामन्यात अध्यक्ष एकादशने सचिव एकादशचा पराभव केला.सचिव एकादशने ८ बाद ७५ धावा केल्या. त्यात गिरीश विटाळकर नाबाद २२, संकेत आसरे १४, अजय यादवने १२ धावा केल्या. अध्यक्ष एकादशकडून आदित्य गोखलेने दोन तसेच विभोर बिसेन, मनीष दोशी, विनोद गोगटे आणि मिलिंद माकडे यांनी एकेक गडी बाद केला.परिमल हेडावूच्या नाबाद ५२ आणि मनीष दोशीच्या १३ धावांमुळे अध्यक्ष एकादशने सहज विजयाची नोंद केली. हेडावू सामनावीर ठरला. सामना सुरू होण्याआधी अलाहाबाद बॅंकेचे ब्रांच हेड के. मुरलीकृष्णा यांच्याहस्ते नाणेफेक पार पडल्यानंतर उभय संघातील खेळाडूंचा त्यांच्याशी परिचय करून देण्यात आला. पाहुण्यांचा परिचय प्रफुल्ल नांदेडकर यांनी करून दिला. पी.टी. लुले यांनी स्वागत केले. (क्रीडा प्रतिनिधी)........................................................................................................................