शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ‘बिनधास्त’ युवी, धोनी बघायला मिळेल

By admin | Updated: January 10, 2017 01:51 IST

भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी पर्याय ठरलेल्या युवराज सिंगने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी पर्याय ठरलेल्या युवराज सिंगने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. धोनी आता जुन्या दिवसांची आठवण ताजी करीत पुन्हा बेदरकार वृत्तीने क्रिकेट खेळताना दिसेल, असा विश्वास युवराजने व्यक्त केला. युवराज म्हणाला, ‘आम्ही जसे सुरुवातीला खेळत होतो ते दिवस पुन्हा येतील. मी त्याच्या तुलनेत पूर्वीच सुरुवात केली होती. युवराजने २००० मध्ये, तर धोनीने २००४ मध्ये पदार्पण केले होते, पण आम्ही सोबत खेळत असताना बेदरकारपणे खेळत होतो. आम्ही आगामी मालिकेत याच पद्धतीने खेळू शकतो.’धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वकप विजेत्या संघाचा (२00७ व २०११) महत्त्वाचा खेळाडू ठरलेल्या युवराजने एक खेळाडू व कर्णधार म्हणून धोनीच्या योगदानाची प्रशंसा केली. युवराज म्हणाला, ‘आमच्या संघाने अव्वल स्थान पटकाविले. दोनदा विश्वविजेतेपद पटकाविणे, ही कामगिरी प्रशंसनीय आहे. किती कर्णधारांनी अशी कामगिरी केली, याची मला नक्की माहिती नाही. धोनी शांतचित्त व अनुभवी कर्णधार होता.’ कर्णधारपद सोडण्याचा धोनीचा निर्णय योग्यच आहे, असे सांगून युवराज म्हणाला ‘२०१९च्या विश्वकप स्पर्धेसाठी संघ तयार करण्यासाठी युवा खेळाडूने नेतृत्व करणे आवश्यक आहे, असा विचार त्याच्या मनात आला असावा. त्यासाठी त्याने विराटच्या नावाचा विचार केला असावा. ’संघात पाचव्यांदा पुनरागमन करीत असलेल्या युवराजच्या मते, विराट कोहली स्वत:च्या कामगिरीद्वारे अन्य खेळाडूंना प्रेरित करू शकतो. विराटचा विचार करता मी त्याला युवा खेळाडूपासून अनुभवी खेळाडू होताना बघितले आहे. तो सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे. कामगिरीच्या जोरावर तो चांगला कर्णधार ठरला आहे. विराटला संघाकडून प्रत्येकवेळी अनुकूल निकाल अपेक्षित असतो. एका चांगल्या कर्णधाराचे ते लक्षण आहे. त्याच्या कामगिरीत प्रत्येक वर्षी सुधारणा होत आहे. त्याने कामगिरी सुधारण्यासाठी लक्ष्य निश्चित केलेले असावे. सुरुवातीला तो खोऱ्याने धावा वसूल करीत होता आणि शतके झळकावीत होता. यंदा त्याने द्विशतके झळकाविण्यास सुरुवात केली आहे. विराट वगळता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत कुणाची सरासरी ५० पेक्षा अधिक आहे, याची मला कल्पना नाही. भविष्यातही विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरेल आणि भारतीय क्रिकेटची आगेकूच सुरू राहील, अशी आशा आहे. - युवराज सिंग