शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

झिम्बाब्वेवरील सफायानंतर भारत वनडेत दुसऱ्या स्थानी कायम

By admin | Updated: July 17, 2015 03:34 IST

वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा ३-0 असा सफाया करणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय टीम रँकिंगमध्ये आज आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. भारताचे ११५ गुण झाले

दुबई : वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा ३-0 असा सफाया करणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय टीम रँकिंगमध्ये आज आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे. भारताचे ११५ गुण झाले असून, ते अव्वलस्थानी असणाऱ्या आॅस्ट्रेलियापासून अजूनही १४ गुणांनी पिछाडीवर आहेत. आॅस्ट्रेलियाचे १२९ गुण आहेत.दरम्यान, बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-१ अशा विजयासह त्यांच्या भूमीवर सलग तिसरी मालिका जिंकल्यामुळे त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २0१७ च्या क्वॉलिफिकेशनसाठी आपला दवा मजबूत केला आहे. दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे ते सातव्या स्थानी आले आहेत. वनडे फलंदाजी क्रमवारीत विराट कोहली (चौथ्या), शिखर धवन (सातव्या) आणि महेंद्रसिंहधोनी (नवव्या स्थानी) यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा अ‍ॅबी डिव्हिलियर्स अव्वल स्थानावर आहे.वनडे गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा एकही गोलंदाज टॉप टेनमध्ये नाही; परंतु यातील काहींनी मात्र प्रगती केली आहे. मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार क्रमांकांनी झेप घेतली असून, तो १२ व्या स्थानी पोहोचला आहे. अक्षर पटेलने १८ स्थानांनी झेप घेतली असून तो ४७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. मोहित शर्मानेदेखील सात क्रमांकांनी झेप घेतली आहे. तो ५१ व्या स्थानी आहे. हरभजनसिंग १0१ व्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)