शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

पदक जिंकल्यानंतर महिला पहिलवानाने कोचलाच उचलून आपटले

By admin | Updated: August 21, 2016 20:31 IST

खासकरून खेळात विजय नोंदविल्यानंतर खेळाडूंना आपापल्या अंदाजात जल्लोष करताना आपण पाहिले आहे़

ऑनलाइन लोकमतरिओ डि जेनेरिओ, दि. 21 - खासकरून खेळात विजय नोंदविल्यानंतर खेळाडूंना आपापल्या अंदाजात जल्लोष करताना आपण पाहिले आहे़ मात्र रिओ आॅलिम्पिकदरम्यान एक अनोखी घटना पाहावयास मिळाली़ जपानची एक महिला पहिलवान रिसाको कवाई हिने सुवर्णपदक जिंकल्यानंतर आपल्या कोचला दोन वेळा उचलून आपटले आणि आपल्या शैलीत विजयी जल्लोष केला़ २१ वर्षीय कवाईने कुस्तीच्या फ्री स्टाईलमध्ये ६३ किलो वजनीगटात अंतिम लढतीत युरोपियन चॅम्पियन बेलारूसच्या मारिया मामाशूकचा ३-० ने पराभव करीत रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आपल्या नावावर कोरले़ रिओ आॅलिम्पिक कुस्ती स्पर्धेतील जपानचे हे चौथे सुवर्णपदक आहे़ या विजयानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता़ या विजयानंतर तेव्हा तिचे कोच काजुहितो सकाई तिच्याजवळ आले तेव्हा त्यांना मिठी मारण्याऐवजी कवाईने त्यांना तेथेच मॅटवर एकानंतर एक असे दोन वेळा उचलून आपटले़ मात्र दोन वेळा आपटल्यानंतरही तिने कोचला आपल्या खांद्यावर घेतले आणि चारही दिशेने चक्कर मारून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला़ तिच्या या अंदाजाचे व्हिडीओ सध्या जगभरात व्हायरल झाले आहे आणि जबरदस्त हिटही झालेले आहे़