शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्य संघटनेच्या मनमानीने कबड्डी खेळाडू बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 03:30 IST

इंचिओन आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या कबड्डी संघातील किशोरी शिंदेला फेडरेशन करंडक स्पर्धेचे अंतिम निवडीचे पत्र देऊन सुध्दा संघातून बाहेर ठेवण्यात आल्यामुळे राज्य संघटनेचा मनमानी कारभार आणि संघटनेत शिजत असलेल्या राजकारणामुळे कबड्डी क्षेत्रात नाराजी व्यक्त केली जात आहे.

पुणे : इंचिओन आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या कबड्डी संघातील किशोरी शिंदेला फेडरेशन करंडक स्पर्धेचे अंतिम निवडीचे पत्र देऊन सुध्दा संघातून बाहेर ठेवण्यात आल्यामुळे राज्य संघटनेचा मनमानी कारभार आणि संघटनेत शिजत असलेल्या राजकारणामुळे कबड्डी क्षेत्रात नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबई येथे शुक्रवारपासून वरिष्ठ गट पुरूष व महिला गटाच्या फेडरेशन कबड्डी स्पर्धेचे आयोजन जोगेश्वरीच्या एसआरपी मैदानावर होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाºया महाराष्टÑाच्या दोन्ही संघाचे प्रशिक्षण शिबीर अलिबाग येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी दोन्ही संघाचे १२-१२ खेळाडू व मार्गदर्शक पोहोचल्यानंतर महिला संघाच्या सरावासाठी पुण्याची १३वी खेळाडू तेथे पोहोचली. अंतिम संघ निवडीच्या वेळी जी १३वी खेळाडू शिबिरात पोहोचली होती तिला अंतिम संघात स्थान देण्यात आले आणि ज्या मुलीच्या (किशोरी) हातात अंतिम निवडीचे पत्र तिला पुन्हा घरी पाठविण्यात आले.राज्य संघटनेच्या पदाधिकाºयांचे असे प्रकार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कराड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत एका महिला खेळाडूला पोटात दुखत आहे असे डॉक्टरचे प्रमाणपत्र घेवून घरी पाठविण्यात आले होते व मर्जीतील खेळाडूला स्थान दिले होते. दोन वर्षांपूर्वी बंगळुरू येथे राष्ट्रीय स्पर्धेत मुंबईच्या एका आंतरराष्ट्रीय खेळाडूला डावलण्यात आले होते. पण जेव्हा संघटनेच्या पदाधिकाºयांवर वरिष्ठ अधिकाºयाकडून दबाव आला तेव्हा रत्नागिरीच्या एका होतकरू महिला खेळाडूऐवजी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला वजनांसाठी उभे केले.>कोणत्याही स्पर्धेचे सराव शिबीर १३ का २० खेळाडूंचे घ्यायचे हा अधिकार संघटनेचा आहे. किशोरी शिंदेच्या निवडीबाबत जेव्हा संघाचे मार्गदर्शक सुहास जोशी यांना विचारले असता त्यांनी सांगितले, पूर्वीसारखा तिचा खेळ आता राहिलेला नाही तिचा फिटनेससुद्धा कमी असल्यामुळे तिची अंतिम बारामध्ये निवड करण्यात आली नाही.- आस्वाद पाटील, राज्य संघटना सचिव