शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

पराभवानंतर पाकसमर्थकांनी जाळले खेळाडूंचे पुतळे!

By admin | Updated: March 22, 2015 01:11 IST

आॅस्ट्रेलियाकडून उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होऊन विश्वचषकाबाहेर पडलेल्या पाकिस्तान संघातील खेळाडूंवर चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे.

कराची : आॅस्ट्रेलियाकडून उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होऊन विश्वचषकाबाहेर पडलेल्या पाकिस्तान संघातील खेळाडूंवर चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. या चाहत्यांनी देशभरात टीव्ही संचांची मोडतोड केली, शिवाय खेळाडूंचे पुतळेही जाळले. दारुण पराभवानंतर चाहत्यांनी विरोध दर्शवीत खेळाडूंच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले. निराश चाहत्यांनी टीव्ही संच फोडलेच, शिवाय चेंडू-बॅट व क्रिकेटच्या अन्य सामानाचीही होळी केली. पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी मात्र संघाची कामगिरी समाधानकारक झाल्याचे सांगून उपांत्यपूर्व सामन्यातील कामगिरी निराशाजनक झाल्याचे म्हटले आहे. जखमांमुळे काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध दिलेल्या झुंजीचीही त्यांनी प्रशंसा केली. पाकच्या माजी खेळाडूंनी या पराभवासाठी कर्णधार मिस्बाह उल हक, मुख्य कोच वकार युनूस आणि पीसीबीला धारेवर धरले. माजी कर्णधार आणि फलंदाज मोहम्मद युसूफ म्हणाला,‘‘इतकी वर्षे कर्णधारपद भूषविल्यानंतरही मिस्बाह संघाबाबत ठोस निर्णय घेऊ शकला नाही, हे दुर्दैव आहे. याचा फटका संघाला बसला. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कुठले खेळाडू हवे, हे कोच व कर्णधाराला माहीत असावे. या संघात राहत अली आणि सोहेल खान यांचा समावेश होता, पण मजेची बाब अशी की दोन्ही खेळाडूंचा संभाव्य ३० जणांमध्ये समावेश नव्हताच.’’ माजी कसोटी कर्णधार आमिर सोहेल याने पाक क्वार्टर फायनलच्या पुढे जाणारच नव्हता, असा दावा केला. तो म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे, तर या संघाने उपांत्यपूर्व सामना खेळला ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल.’’ माजी कर्णधार रशीद लतिफ म्हणाला, ‘व्यवस्थापनाच्या चुकीचा फटका संघाला बसला आहे. व्यवस्थापनाने काही मोठ्या चुका केल्या आणि खेळाडू जखमी झाले, त्याचाही विपरीत परिणाम संघावर झाला.’’ (वृत्तसंस्था) आम्हाला माफ करा!मी दु:खी आहे. पराभवाबद्दल देशातील जनतेची माफी मागतो. आमच्याकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. आम्ही सामना जिंकू शकलो असतो, पण कमी पडलो. पुन्हा उभे राहण्यासाठी चाहत्यांचा पाठिंबा हवा आहे.- वहाब रियाझ, पाकचा वेगवान गोलंदाज