शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

बंदी उठल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला संघात हवाय धोनी

By admin | Updated: July 14, 2017 16:56 IST

आयपीएलमध्ये पुनरागमन करताना संघाची ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपरकिंग्जला आपल्या संघात हवा आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - आयपीएलच्या ११ व्या मोसमात स्पर्धेमध्ये आमुलाग्र झालेले क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरचर दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे स्पर्धेत पुनरागमन होणार आहे. आता स्पर्धेत पुनरागमन करताना संघाची ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपरकिंग्जला आपल्या संघात हवा आहे. परवानगी मिळाल्याच धोनीला संघात कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  
आयपीएल २०१७ ची अंतिम फेरी आटोपल्यावर लगेचच चेन्नई सुपरकिंग्जने ट्विटरवरून पुनरागमनाची घोषणा केली होती. पण त्यांच्यावर घालण्यात आलेली बंदी आज अधिकृतरित्या  संपुष्टात आली आहे. २०१३ साली झालेल्या स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणानंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांची दीर्घ चौकशी चालली होती. त्यानंतर जुलै २०१५ मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. दरम्यान ही बंदी संपुष्टात आल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज क्रिकेट लिमिटेडच्या संचालकांपैकी एक असलेल्या जॉर्ज जॉन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत चर्चा करताना सांगितले की, "आम्हाला जर खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची संधी मिळाली तर आम्ही महेंद्रसिंग धोनीला संघात कायम ठेवू."अधिक वाचा 
 
आयपीएलच्या सुरुवातीपासून महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपरकिंग्ज हे समीकरण बनले होते. धोनीने सलग ८ हंगामात चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व केले होते. या आठ हंगामात प्रत्येकवेळी चेन्नईचा संघ किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला होता. तसेच चेन्नईने सहा वेळा आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. त्यापैकी दोन वेळा त्यांनी विजेतेपदावर कब्जा केला होता. एकंदरीत चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व करताना धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला होता. 
चेन्नई सुपरकिंग्जवर बंदी घालण्यात आल्यानंतर धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला. पण अपवाद वगळता त्याला पुण्याकडून म्हणावी तशी छाप पाडता आली नव्हती. दरम्यान दोन वर्षांच्या बंदीनंतरही चेन्नई सुपरकिंग्जच्या ब्रँडला नुकसान झाले नसून अनेक प्रायोजक आमची माहिती घेत आहेत.