शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

३६ वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By admin | Updated: August 12, 2016 05:14 IST

उप उपांत्यपूर्व फेरीतील जर्मनी आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्याने भारताने उपांत्यपूर्व फेरीतील धडक मारली आहे. १९८०नंतर प्रथमचं भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. १२ : उप उपांत्यपूर्व फेरीतील जर्मनी आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्याने भारताने उपांत्यपूर्व फेरीतील धडक मारली आहे. १९८०नंतर प्रथमचं भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाच्या आज झालेल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जाव लागलं. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला एकापाठोपाठ एक पेनल्टी कॉर्नर मिळाले असले तरी चौथ्या लढतीत हॉलंडविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे ३२ वर्षांपूर्वी हॉलंडविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यात भारत अपयशीच ठरला.

भारताला अखेरच्या सेकंदाला पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यावर भारताला गोल नोंदवता आला नाही. भारताला ह्यबह्ण गटातील चौथ्या साखळी सामन्यात १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. भारतातर्फे व्ही.आर. रघुनाथने ३८ व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवला. हॉलंडतर्फे रोजिर होफमॅनने ३२ व्या मिनिटाला आणि मिंक वान डेर वीरडनने ५४ व्या मिनिटाला गोल नोंदवले. भारताने सलामी लढतीत आयर्लंडचा ३-२ आणि त्यानंतर अर्जेंटिनाचा २-१ ने पराभव केला. भारताला जर्मनी व हॉलंड या संघांविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. सामन्याच्या सुरुवातीला भारताने विद्यमान युरोपियन चॅम्पियन हॉलंडविरुद्ध चांगला बचाव केला. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. त्यानंतर वेगवान खेळ बघायला मिळाला. हॉलंडतर्फे रोजर होफमॅनने ३२ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित संघाचे खाते उघडले. लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाचा मानकरी ठरलेल्या हॉलंडला हा आनंद अधिक वेळ उपभोगता आला नाही.

३८ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. व्ही.आर. रघुनाथने गोल नोंदवित भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर उभय संघांनी गोलचा चांगला बचाव केला, पण अखेरच्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर देणे भारताला महागडे ठरले. मिंक वान डेर वीरडनने ५४ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाने ह्यबह्ण गटात चार सामन्यात दोन विजयासह ६ गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. हॉलंडच्या खात्यावर एकूण १० गुणांची नोंद असून सहा संघांमध्ये हा संघ अव्वल स्थानी आहे.