शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

पाकने २0 वर्षांनंतर कांगारूंना नमविले

By admin | Updated: November 4, 2014 01:36 IST

याआधी पाकिस्तानने १९९४ मध्ये आपल्याच भूमीवर ३ कसोटी सामन्यांची मालिका १-0 अशी जिंकली होती.

अबुधाबी : कर्णधार मिस्बाह उल हकची विक्रमी शतकी खेळी आणि त्यानंतर जुल्फिकार बाबरची भेदक गोलंदाजी (५ बळी) या जोरावर पाकिस्तानने आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुस-या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी ३५६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्याचप्रमाणे २0 वर्षांनंतर प्रथमच त्यांनी या संघाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. याआधी पाकिस्तानने १९९४ मध्ये आपल्याच भूमीवर ३ कसोटी सामन्यांची मालिका १-0 अशी जिंकली होती.दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने आॅस्ट्रेलियासमोर ६0३ धावांचे कठीण असे लक्ष्य ठेवले होते; प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलियाचा संघ पाचव्या व अखेरच्या दिवशी ८८.३ षटकांत २४६ धावांत गारद झाला. त्याचबरोबर पाकिस्तानने मालिकेत २-0 असा आॅस्ट्रेलियाचा सफाया केला. पाकिस्तानने पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाचा २२१ धावांनी पराभव केला होता.आॅस्ट्रेलियातर्फे फक्त स्टीव्हन स्मिथने एकाकी झुंज देताना ९७ धावांची खेळी करताना पाकिस्तानला विजयासाठी प्रतीक्षा करायला लावली. स्मिथशिवाय डेव्हिड वॉर्नरने ५८ धावा केल्या, तर ७ फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजांसमोर दुहेरी आकडी धावसंख्यादेखील पार करू शकले नाहीत.सामन्याच्या अखेरच्या दिवशी पाकिस्तानकडून जुल्फिकार बाबरने ३२.३ षटकांत १२0 धावा देत सर्वाधिक ५ गडी बाद केले. त्याला यासीर शाहने ४४ धावांत ३ आणि मोहम्मद हाफीजने ३८ धावांत २ गडी बाद करीत साथ दिली.आॅस्ट्रेलियाने कालच्या ४ बाद १४३ या धावसंख्येवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. स्मिथने नाबाद ३८ धावांवरून पुढे खेळताना २0४ चेंडूंत १२ चौकारांसह एकूण ९७ धावा करीत आॅस्ट्रेलियाच्या आशा जिवंत ठेवल्या; परंतु पाकिस्तानच्या यासीर शाहने स्मिथला पायचित करीत २३८ या धावसंख्येवर सहाव्या फलंदाजाच्या रूपाने तंबूत धाडले. मिचेल मार्शने ४७ धावांचे योगदान देताना स्मिथबरोबर पाचव्या गड्यासाठी १0७ धावांची भागीदारी केली; परंतु अन्य फलंदाजांना पाकिस्तानी गोलंदाजांसमोर सपशेल नांगी टाकली. आॅस्ट्रेलियाने त्यांचे अखेरचे ५ फलंदाज ४३ चेंडूंत आणि ८ धावांत गमावले. (वृत्तसंस्था)