शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

द. आफ्रिका ‘अ’ संघाची विनंती द्रविडने केली मान्य

By admin | Updated: August 9, 2015 22:49 IST

चेन्नईतील दमट वातावरणामुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचे सहा खेळाडू आजारी झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना पोटाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे भारत ‘अ’ संघ तिरंगी

चेन्नई : चेन्नईतील दमट वातावरणामुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचे सहा खेळाडू आजारी झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना पोटाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे भारत ‘अ’ संघ तिरंगी मालिकेत आॅस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाच्या स्थानी खेळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाच्या संघव्यवस्थापनाने भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत संपर्क साधला आणि कार्यक्रमामध्ये बदल करण्याची विनंती केली. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचे सहा खेळाडू आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या लढतीत खेळण्यास फिट नाहीत. द्रविड यांनी ही विनंती मान्य केली. आता भारत ‘अ’ आॅस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारऐवजी सोमवारी लढत खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका संघातर्फे आज भारत ‘अ’ संघाचा १२ वा खेळाडू मनदीपसिंगला क्षेत्ररक्षण करावे लागले. क्विंटन डिकाकला स्नायूच्या दुखापतीचा त्रास जाणवल्यामुळे मनदीप क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. यावरून दक्षिण आफ्रिका संघाच्या परिस्थितीची कल्पना येते. यापूर्वी दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा व्हिडिओ विश्लेषक कोएर्टजन डावखुरा वेगवान गोलंदाज एमथोकोजिसी शेजीच्या स्थानी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला होता. कोएर्टजनने क्षेत्ररक्षण करताना सीमारेषेवर एक शानदार झेल टिपण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो अपयशी ठरला. त्या वेळी समालोचन करणारे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी कोएर्टजनची प्रशंसाही केली. त्याआधी भारत ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीच्या तुलनेत या लढतीत सीमारेषेचे अंतर १० गजाने वाढविण्यात आले. आॅस्ट्रेलियाचा फलंदाज जो बर्न्सने भारत ‘अ’ संघाविरुद्ध १४ षटकार ठोकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. सीमारेषेचे अंतर अधिक असते तर यातील किमान चार किंवा पाच फटक्यांवर झेल टिपण्याची संधी होती. द्रविड यांनी भारताचा माजी लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सीमारेषेचे अंतर वाढविण्याचे समर्थन केले. (वृत्तसंस्था)