शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

अफगाणिस्तानने आफ्रिकेला झुंजविले

By admin | Updated: March 21, 2016 02:27 IST

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना तुफानी फलंदाजी केलेल्या नवख्या अफगाणिस्तानची अफलातून खेळी अपयशी ठरली. अनुभवाची कमतरता व दडपणाखाली झालेल्या चुका

रोहित नाईक,  मुंबई दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना तुफानी फलंदाजी केलेल्या नवख्या अफगाणिस्तानची अफलातून खेळी अपयशी ठरली. अनुभवाची कमतरता व दडपणाखाली झालेल्या चुका यामुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० विश्वचषक स्पर्धेत ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला. आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या आफ्रिकेला या वेळी झुंजावे लागले.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव १७२ धावांत संपुष्टात आला. सलामीवीर मोहम्मद शाहजादने अफगाणिस्तानला जबरदस्त सुरुवात करून देताना कागिसो रबाडा व काएल एबॉट यांच्यावर तुफानी हल्ला करून चौथ्याच षटकात संघाचे अर्धशतक झळकावले. या धमाकेदार सुरुवातीनंतर आफ्रिकन्स दबावाखाली आले. मात्र, ख्रिस मॉरिसने शाहझादचा त्रिफळा उडवून संघाच्या विजयातील मुख्य अडसर दूर केला. शाहझादने १९ चेंडूत ३ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करत ४४ धावांचा तडाखा दिला.यानंतर नूर अली झदरान (२४ चेंडूत २५ धावा), गुलबदीन नैब (१८ चेंडूत २६) व सामीउल्लाह शेनवारी (१४ चेंडूत २५) यांनी शानदार फटकेबाजीसह संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, दडपणाखाली विकेट गेल्याने आफ्रिकेने सामन्यावर पूर्ण पकड मिळवली. मॉरिसने अचूक मारा करत २७ धावांत ४ खंदे फलंदाज बाद करून अफगाण संघाचे कंबरडे मोडले. तर काएल एबॉट, इम्रान ताहीर व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.याआधी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर आफ्रिकेने अपेक्षित आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ५ बाद २०९ धावा उभारल्या. हाशिम अमला (५) स्वस्तात परतल्यानंतर क्विंटन डीकॉक (४५) व फाफ डू प्लेसिस (४१) यांनी दमदार फटकेबाजीसह आफ्रिकेच्या मजबूत धावसंख्येचा पाया रचला. डीकॉकने ३१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकरांसह आपली खेळी सजवली. तर प्लेसिसने २७ चेंडूंत ७ चौकार व एक षटकार ठोकला. यानंतर धडाकेबाज एबी डिव्हीलियर्सने निर्णायक फटकेबाजी करताना संघाला दोनशेचा टप्पा पार करून देण्यात मोलाचे योगदान दिले. त्याने आपल्या खास शैलीत फटकेबाजी करताना अफगाण गोलंदाजीला मजबूत चोप दिला. केवळ २९ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार व ५ षटकारांसह शानदार ६४ धावांसह वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. जेपी ड्युमिनीनेही (नाबाद २९) छोटेखानी आक्रमक खेळीसह एबीला चांगली साथ दिली.