मुंबई : येथे सुरू असलेल्या दुसऱ्या इंडियन ओपन स्नूकर जागतिक मानांकन स्पर्धेत यजमान भारताला स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच मोठा धक्का बसला. आदित्य मेहताला इंग्लंडच्या रिकी वॉल्डेनने पराभूत केल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याचवेळी थायलंडच्या थेपचैया उन-नूह याने तिसऱ्या फेरीत आगेकूच केल्याने त्याच्या रूपाने स्पर्धेत एकमेव आशियाई खेळाडूचे आव्हान कायम राहिले आहे.बिलियडर््स अॅण्ड स्नूकर फेडरेशन आॅफ इंडियाच्या (बीएसएफआय) वतीने सुरू असलेल्या या स्पर्धेत आदित्यला रिकी विरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला. पहिले तीन फ्रेम गमावल्याने आदित्य रिकी हा सुरुवातीलाच ०-३ अस पिछाडीवर पडला होता. यावेळी आदित्य दबावाखाली असल्याचे जाणवले. मात्र सलग दोन फ्रेम जिंकताना आदित्यने रिकीला जोरदार प्रत्युत्तर देताना २-३ अशी पिछाडी कमी केली. या वेळी आदित्य जबरदस्त पुनरागमन करणार असे दिसत होते. मात्र जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानी असलेल्या वॉल्डेनने आपला दर्जा सिद्ध करताना सहाव्या फ्रेममध्ये निर्णायक बाजी मारीत ७०(६३)-०, ७८(४२)-२७, ७७-१३, १८-७३, ०-७६(४६), ८१(४३)-१ असा विजय मिळवला.दुसऱ्या बाजूला स्पर्धेत एकमेव आशियाई खेळाडू म्हणून आव्हान कायम ठेवलेल्या उन-नूह याने वेल्सच्या कसलेल्या जेमी जोन्सचे कोणतेही दडपण न घेता ४-१ अशी सहज आगेकूच केली. पहिला फ्रेम गमावून पिछाडीवर पडलेल्या उन-नूह याने जबरदस्त पुनरागमन करताना सलग चार फ्रेम जिंकण्याची किमया करीत १७-६३, ७३९५५)-१०, ६९-५८, ७९(५१)-१, १२३(१२३)-४ असा शानदार विजय मिळवला. (क्रीडा प्रतिनिधी)
आदित्य मेहताला पराभवाचा धक्का
By admin | Updated: March 14, 2015 01:50 IST