शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अदिती अशोकने रचला इतिहास

By admin | Updated: November 14, 2016 01:54 IST

आॅलिम्पियन अदिती अशोक हिने आपला सर्वोत्तम खेळ करत रविवारी डीएलएफ गोल्फ अ‍ॅण्ड कंट्री क्बलमध्ये हिरो महिला इंडियन ओपनचा किताब पटकावला.

गुडगाव : आॅलिम्पियन अदिती अशोक हिने आपला सर्वोत्तम खेळ करत रविवारी डीएलएफ गोल्फ अ‍ॅण्ड कंट्री क्बलमध्ये हिरो महिला इंडियन ओपनचा किताब पटकावला. रियो आॅलिम्पिक स्पर्धेत उत्तम प्रदर्शन केलेल्या अदिती हिने तिसऱ्या आणि अखेरच्या फेरीत पार ७२ चे कार्ड खेळले आणि त्यासोबतच तिने इंडियन ओपनचा किताब पटकावला.अदितीचा स्कोअर ५४ होलनंतर तीन अंडर २१३ असा होता. या विजयाने तिला ६० हजार डॉलरचा पुरस्कार मिळाला आहे. या वर्षात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ती पहिल्या स्थानी पोहोचली आहे.अदितीने अखेरच्या फेरीत आपली आघाडी कमी-जास्त होत असताना रोमांचक स्थितीत शॉटवर नियंत्रण ठेवले. तिला अमेरिकेची ब्रिटनी लिसीकोम आणि स्पेनच्या बेलेन मोजो यांचे आव्हान मिळाले होते. ब्रिटनी आणि बेलेन दोन अंडर २१४ च्या स्कोअरसह संयुक्त दुसऱ्या स्थानी आहेत.या विजयाने अदिती वर्षात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रस्थानी पोहचेल. ती म्हणाली, ‘या वर्षात मला कतार आणि दुबईत आणखी दोन स्पर्धा खेळायच्या आहेत. त्यातही चांगला खेळ करावा लागेल. त्यामुळे मी अग्रस्थानी पोहोचेल.’अदितीने अखेरच्या फेरीत दोन शॉटच्या आघाडीसह उतरली. तिने फ्रंट नऊ पार खेळला. आणि ती महिला युरोपियन टूरच्या पहिल्या फेरीत आघाडीवर राहिली. मात्र, ब्रिटनीने दबाव बनवला आणि अपला स्कोअर एकूण दोन अंडर २१४ वर संपवला. अखेरच्या फेरीतील दोन होल शिल्लक असताना अदिती अणि बेलेन यांनी १७ व्या होलमध्ये बोगी केली. ब्रिटनीच्या बरोबरीत त्या पोहोचल्या आणि १८ व्या होलमध्ये बेलेन हिने पार खेळला. तर अदितीने अविश्वसनीय शॉट मारत बर्डी खेळली आणि विजेतेपद पटकावले. थायलंडच्या कानफानितनेन मुआंगखुमसाकुल हिने चौथे स्थान तर इंग्लंडच्या फ्लोरेंटिना पार्कर हिने पाचवे स्थान पटकावले. वाणी कपूर हिने २८ वे स्थान राखले. तर दीक्षा डागर हिने २२९ च्या स्कोअरसह स्पर्धेतील सर्वोत्तम अमॅच्युअर खेळाडूचा किताब पटकावला.(वृत्तसंस्था)